शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
2
टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
3
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
4
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
5
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
6
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
7
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
8
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
9
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
10
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
11
लहामटे विरुद्ध भांगरे... अकोलेतील मतविभागणी कोणाचे पारडे जड करणार? 
12
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
13
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
14
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
15
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
16
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
17
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
18
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
19
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
20
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी

कोल्हापूर: ‘राजाराम’ कारखान्याच्या मतदार यादीची अर्हता ठरेना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 1:30 PM

पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या.

राजाराम लोंढेकोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १६ साखर कारखाने निवडणुकीस पात्र असून, त्यातील ‘गडहिंग्लज’ व ‘निनाईदेवी’ साखर कारखान्यांची प्रक्रिया सुरू आहे. कसबा बावडा येथील राजाराम कारखान्यांच्या सभासदांबाबत न्यायालयाने निकाल दिल्याने ऑक्टोबरमध्ये त्यांची प्रक्रिया सुरू होईल, असे वाटत होते. मात्र मतदार यादीच्या अर्हता दिनांकाबाबत सहकारी प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे.पावसाळ्यामुळे स्थगित केलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आल्या. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज कारखाना व सांगली जिल्ह्यातील निनाईदेवी साखर कारखान्यांची मतदान प्रक्रिया सुरू आहे. या कारखान्यांची प्रक्रिया नोव्हेंबरच्या पहिल्या, दुसऱ्या आठवड्यात संपणार आहे. येत्या दोन दिवसात कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी कासारी साखर कारखान्याची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल.‘राजाराम’ कारखान्याच्या वाढीव मतदारांबाबत न्यायालयाने निकाल दिला आहे. या कारखान्यांची मतदार यादीची अर्हता दिनांक किती असावी, याबाबत सहकारी प्राधिकरणाकडे मार्गदर्शन मागवले आहे. मात्र अद्याप आले नसल्याने प्रक्रिया थांबली आहे. अर्हता दिनांक आल्यानंतर संलग्न संस्थांकडून प्रतिनिधींच्या नावांचे ठराव व कारखान्यांकडून सभासद यादी मागवली जाणार आहे. साधारणत: या आठवड्यात अर्हता दिनांक समजले तर याद्या तयार करण्यास किमान महिन्याचा कालावधी जाऊन त्यानंतर प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. त्यामुळे ‘राजाराम’चे रणांगण फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू होऊ शकते.साखराळे (ता. वाळवा) येथील राजारामबापू साखर कारखान्यांकडेही मतदार यादी मागवली आहे. येत्या आठवड्याभरात त्यांची यादी आली की तेही प्रसिद्ध करून हरकतीची प्रक्रिया सुरू हाेईल.

प्रारूप यादी ते मतदानासाठी तीन महिन्याचा कालावधीप्रारूप यादी प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती, सुनावणी व अंतिम यादी प्रसिद्ध करणे यासाठी दीड महिन्याचा कालावधी जातो. प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमासाठी तेवढाच कालावधी जात असल्याने प्रारूप यादी ते निकाल येथेपर्यंत किमान तीन महिने लागतात.

‘माणगंगा’कडे निवडणुकीसाठी पैसेच नाहीतआटपाडी तालुक्यातील माणगंगा साखर कारखाना बंद आहे. निवडणुकीसाठी कारखाना प्रशासनाकडे पैसे नसल्याने या कारखान्यांची निवडणूक होण्याची शक्यता धूसर आहे.

संचालक मंडळाची मुदत संपलेले कारखाने -कारखाना                                      मुदत संपलेली तारीख

छत्रपती राजाराम, कसबा बावडा             २० एप्रिल २०२०माणगंगा, सोनारसिद्धनगर, आटपाडी         २८ मे २०२०राजारामबापू, साखराळे, वाळवा             २९ मे २०२०निनाईदेवी, कोकरुड, शिराळा                ५ ऑगस्ट २०२०कुंभी कासारी, कुडित्रे, करवीर               २८ डिसेंबर २०२०आप्पासाहेब नलवडे, गडहिंग्लज            २९ मार्च २०२१शेतकरी, कोकळे, मिरज                     १७ एप्रिल २०२१सह्याद्री, धामोड, राधानगरी                  १९ एप्रिल २०२१जी. डी. बापू लाड, कुंडल, पलूस           ६ मे २०२१इंदिरा गांधी, तांबाळे, भुदरगड               १६ मे २०२१वसंतदादा, सांगली                           २२ मे २०२१आजरा, गवसे                                २३ मे २०२१हुतात्मा अहिर, वाळवा                      १६ एप्रिल २०२२भोगावती, परिते, करवीर                    २४ एप्रिल २०२२गायकवाड, सोनवडे, शाहुवाडी             १ मे २०२२सर्वोदय, कारंदवाडी, वाळवा               २१ जून २०२२

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने