शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
2
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
4
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
5
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
6
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
7
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
8
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
9
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
10
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
11
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
12
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
13
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
14
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
15
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
16
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
17
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
18
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
19
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
20
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले

Kolhapur News: ..म्हणून धरणातील पाणीसाठा कमी केला, कार्यकारी अभियंता विनया बदामी यांचा खुलासा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 1:40 PM

आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवर पाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता

कोल्हापूर : दूधगंगा धरणाच्या तांत्रिक अभ्यासानुसार स्थैर्यता व सुरक्षिततेसाठी धरणातील ६ टीएमसी पाणीसाठा कमी करण्यात आल्याचा खुलासा दूधगंगा कालवे विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता विनया बदामी यांनी सोमवारी केला. मागील आठवड्यात आमदार हसन मुश्रीफ यांनी जलसंपदा विभागामुळे कोल्हापूरवरपाणीबाणी ओढवल्याचा आरोप केला होता.राधानगरी तालुक्यातील दूधगंगा प्रकल्प अंतर्गत २५.४० टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यात आले असून, २००६ पासून त्यात पूर्ण क्षमतेने पाणीसाठा केला जातो. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टर क्षेत्र सिंचित असून, प्रकल्पाच्या आंतरराज्यीय करारानुसार कर्नाटकला ४ टीएमसी पाणी दिले जाते. धरणाचा सांडवा व काही भाग असा ४९० मीटर लांबीचे दगडी बांधकाम असून, २००७ पासून गळती आहे. सुरुवातीला सेकंदाला ३६० लि. से. इतकी दुरुस्तीनंतर १६६ लि से. गळती निदर्शनास आली. मात्र, २०२१-२२ मध्ये पुन्हा ३५० लिटर गळती दिसून आली.त्यामुळे जलसंपदा विभागांतर्गत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व केंद्र शासनाच्या पुण्यातील सीडब्ल्यु, पीआरएस संस्थेकडून पाहणी करून घेतली. त्यानुसार ही गळती धरणाच्या बांधकामाला छेद देऊन खालील बाजूस पाणी उसळत असल्याने व धरणाच्या बांधकामाची घनता कमी झाल्याने वाढली आहे. गळती काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता, सोपस्कार पूर्ण करून काम हाती घेईपर्यंत खबरदारीचा उपाय म्हणून पाणीसाठा १९.६८ टीएमसी इतकाच करावा असे निर्देश देण्यात आले.गळती काढण्यासाठी ग्राऊटिंग व इतर बांधकाम पद्धतीचे ८०.३६ कोटीचे अंदाजपत्रक जलसंपदा विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी सादर करण्यात आले आहे. पावसाळा लांबल्याने धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आल्याचे जलसंपदा विभागाने म्हटले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरDamधरणWaterपाणी