शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांच्याकडून तुतारी गटाने आदर्श घ्यायला हरकत नाही, जर...!" राष्ट्रवादीच्या आमदाराची खुली ऑफर
2
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
3
कर्नाटकचे माजी डीजीपी ओम प्रकाश यांची निर्घृण हत्या; पत्नीवर संशय, कारण काय..?
4
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
5
'INDIA आघाडी कायम राहणार; आगामी निवडणुका एकत्र लढू', अखिलेश यादवांचे सूचक विधान
6
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
7
IPL 2025 PBKS vs RCB : किंग कोहलीचं विक्रमी अर्धशतक! पंजाबला पराभूत करत आरसीबीनं मारला 'पंजा'
8
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
9
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
10
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
11
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
12
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
13
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
14
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
15
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
16
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
17
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
18
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
19
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
20
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?

पुरवठा विभागाची महाफूड वेबसाइट दोन महिने बंद, राज्यभरातील कामे ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 13:04 IST

गौरव सांगावकर राधानगरी (जि. कोल्हापूर ) : गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘महाफुड’ ही ...

गौरव सांगावकरराधानगरी (जि. कोल्हापूर) : गेल्या दोन महिन्यांपासून राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागातील ‘महाफुड’ ही वेबसाइट बंद असल्याने शिधापत्रिकेसंबंधित सर्व ऑनलाइन कामे बंद आहेत. त्याचा राज्यभरातील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.या विभागातून नाव वाढवणे, नाव कमी करणे, दुबार शिधापत्रिका काढणे, आधारसंबंधित कामे, नवीन शिधापत्रिका देणे, शासकीय विभागातून वैद्यकीय उपचारासाठी पुरवठा विभागातून लागणारे दाखलेही मिळत नसल्याने आरोग्यसंबंधित योजनांचा लाभ घेताना अडचणी येत आहेत. अन्न व नागरी पुरवठा विभागातील ही सर्वच कामे ठप्प असल्याने सर्वच तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.काही काळासाठी वेबसाईट चालू असते. यामुळे काहीजणांची कामे अर्ध्यात खोळंबली आहेत. लोक आपल्या शासकीय कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी येतात; पण सर्व्हर समस्या येत असल्याने काम पूर्ण न झाल्याने पुन्हा सात-आठ दिवसांनी या, असे कर्मचारी सांगतात. पुन्हा आले तरी हीच समस्या उद्भवत आहे. नागरिकांनी पुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता, वेबसाइट अद्याप चालू नसल्याचे सांगण्यात येते.मात्र, या समस्या निवारणासाठी प्रत्येक तालुक्याच्या स्थानिक विभागाकडून कोणतीही हालचाल दिसत नाही. ‘सर्व्हर डाउन असल्याने आम्ही काय करणार?’ हीच भूमिका तालुक्यातील प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. एकाच कामासाठी तालुक्याच्या ठिकाणी नागरिकांना अनेक हेलपाटे घालावे लागत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील १४ कार्यालयांत लोकांना हाच अनुभव येत आहे. ही अडचण लवकर दूर करून नागरिकांना नाहक होणारा त्रास कमी करावा, अशी मागणी होत आहे.

ही तांत्रिक अडचण असल्याने या संदर्भात मंत्रालयातील संगणक विभागाला वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत. वेबसाइट सुरू होण्यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. नवीन सर्व्हरवर काम चालू असून आठ-दहा दिवसांत वेबसाईट सुरळीत सुरू होईल. - मोहिनी चव्हाण, जिल्हा पुरवठा अधिकारी, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरonlineऑनलाइनFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग