कोल्हापूर : शाहूपुरी येथील एका कॉम्प्युटर सेंटरमध्ये सेंटरच्या चालकाने महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. २४) सकाळी दहाच्या सुमारास घडला. याबाबत धैर्यशील विश्वास काटकर (वय ४०, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शाहूपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विवाहितेने शाहूपुरीतील कॉम्प्युटर सेंटरमध्ये नोकरीसाठी मुलाखत दिली होती. मंगळवारी तिच्या नोकरीचा पहिलाच दिवस होता. त्यावेळी सेंटर चालक धैर्यशील काटकर हा कार्यालयीन कामकाज दाखवण्यासाठी महिलेला दुसऱ्या मजल्यावर घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने महिलेशी अश्लील वर्तन करीत तिचा विनयभंग केला. या प्रकाराने घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा करून पतीला फोन लावून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पतीसह अन्य नातेवाइकांनी कॉम्प्युटर सेंटरमध्ये धाव घेऊन संशयित काटकर याला शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पीडितेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी संशयित काटकर याच्यावर गुन्हा दाखल केला.
Kolhapur Crime: नोकरीच्या पहिल्याच दिवशी महिलेचा विनयभंग, संगणक सेंटर चालकावर गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:47 AM