शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

डोक्यात दगड घालून मित्रांनीच केला तरुणाचा निर्घृण खून; दोघे ताब्यात

By उद्धव गोडसे | Published: November 30, 2023 10:28 AM

निर्माण चौक परिसरातील घटना, दोन संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

उद्धव गोडसे 

कोल्हापूर : निर्माण चौक येथील मैल खड्डा परिसरात शुभम अशोक पाटील (वय ३०, रा. रामानंदनगर, कोल्हापूर) याच्या डोक्यात दगड घालून दोन मित्रांनी निर्घृण खून केला. ही घटना बुधवारी (दि. २९) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी संशयित हल्लेखोर संग्राम पाडळकर (रा. पाडळकर चौक, हॉकी स्टेडियम जवळ, कोल्हापूर) आणि बंडा मोरे (रा. नेहरूनगर, कोल्हापूर) या दोन संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुभम पाटील हा बुधवारी रात्री मैल खड्डा परिसरात त्याच्या दोन मित्रांसह बसला होता. अज्ञात कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्याच वादातून पाडळकर आणि मोरे या दोघांनी डोक्यात दगड घालून शुभमचा निर्घृण खून केला. पहाटेच्या सुमारास याची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून शुभम पाटील याच्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये पाठवला. पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने संशयित हल्लेखोर संग्राम पाडळकर आणि बंडा मोरे यांना ताब्यात घेतले. याबाबत मृत शुभम याचे वडील अशोक भीमाशंकर पाटील (रा. रामानंद नगर, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर