कोल्हापूर : प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या हौसेसाठी कावळा नाका परिसरातील वर्कशॉपमधून बुलेट चोरणाऱ्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडले. संशयित जयदीप शहाजी पाटील (वय २२, रा. सुयोग कॉलनी, कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे.अधिक माहिती अशी, पंडित बापू सुतार (४८, रा. शेंडूर, ता. कागल) यांची बुलेट (एमएच ०९ ईएच ६५३५) मुलगा अवधूत व भाचा शनिवारी (दि. २६) कावळानाका येथील वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगसाठी घेऊन आले होते. यावेळी अनोळखी युवकाने सुतार यांचा मुलगा अवधूत याला मी वर्कशॉपमधील कर्मचारी आहे असे सांगून बुलेट ट्रायलसाठी घेऊन गेला. तो परत आला नाही.
फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर पंडित सुतार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. २८) फिर्याद दिली. वर्कशॉपच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्याद्वारे पोलीस चोरट्याचा माग काढला असता कावळा नाक्याहून शिवाजी विद्यापीठामार्गे हॉकी स्टेडियमकडून कळंब्याच्या दिशेने घेऊन गेल्याचे दिसले. त्यानंतर चोरटा हा कळंबा येथे राहत असल्याचे समजताच घरी छापा टाकून त्याला ताब्यात घेतले.
साहेब, आपण चोर नाही. माझा प्रेमविवाह झाला आहे. पत्नीला बुलेट आवडते. अधिक महिना असल्याने सासुरवाडीला जाण्याचा बेत आखला. बुलेट कावळा नाका परिसरातील वर्कशॉपमध्ये सर्व्हिसिंगला येत असल्याची माहिती होती. त्यानुसार वर्कशॉमध्ये कर्मचारी असल्याचे सांगून सर्व्हिसिंगला आलेल्या तरुणाकडून चावी घेऊन ट्रायलच्या नावाखाली बुलेट घेऊन पसार झालो. तेथून कळंबा येथील घरी आलो. याठिकाणी नंबरप्लेट बदलून पत्नीला नवीन बुलेट खरेदी केल्याचे सांगितले. त्याच दिवशी पत्नीला घेऊन मोरेवाडी (सातारा) येथील सासूरवाडीस गेलो. सासू-सासºयांना लग्न केल्यानंतर जावयाची प्रगती झाली असे वाटावे यासाठी नवीन बुलेट खरेदी केल्याचे सांगितले. त्यानंतर बुलेटचे पूजनही केले. सासरवाडीत मुक्काम करून सोमवारी (दि. २८) कोल्हापुरात आलो. पत्नीच्या हौसेपोटी आपण चोरी केल्याचे सांगितले.घरची परिस्थिती चांगलीच्संशयित जयदीप हा पत्नीसह गणपतीपुळे येथे एका जहाज कंपनीत काम करत होते. चार महिन्यांपूर्वी दोघांनीही नोकरी सोडली. प्रेमविवाह केल्याने दोघेही कळंबा येथे भाड्याने घर घेऊन राहू लागले.च्सध्या तो टिंबर मार्केट परिसरात अत्तर विक्रीचे काम करतो. त्याचे आई-वडील कुरळपमध्ये राहतात. वडील सेवानिवृत्त आहेत. आई गृहिणी आहे. जयदीप हा पदवीधर आहे. त्याच्या घरची परिस्थिती चांगली आहे.च्चोरीचा प्रकार समजताच त्याच्या आई-वडिलांसह सासरच्या लोकांना मानसिक धक्का बसला आहे.