शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
2
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
3
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
4
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
5
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
6
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
7
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
8
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
9
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
10
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
11
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
12
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
13
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
14
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
15
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
16
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
17
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
18
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
19
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
20
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज

‘कृष्णा’च्या तत्कालीन कार्यकारी संचालकाला अटक

By admin | Published: April 20, 2017 11:54 PM

बोगस कर्ज प्रकरण; मंगळवेढ्यातून घेतले ताब्यात

कऱ्हाड : कृष्णा कारखान्यातील बोगस कर्जप्रकरणी तत्कालीन कार्यकारी संचालकांना बुधवारी रात्री उशिरा कऱ्हाड शहर पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. अशोक श्रीरंग नलवडे (रा. मंगळवेढा) असे त्यांचे नाव आहे. अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत.रेठरे बुद्रुक-शिवनगर येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यात बोगस कर्ज प्रकरणे झाल्याचा प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. कारखान्याच्या ७८४ ऊसतोडणी वाहतूक कंत्राटदारांच्या नावे बोगस स्वाक्षऱ्या करून प्रत्येकी सात लाख रुपयांप्रमाणे ५८ कोटींचे कर्ज काढण्यात आले होते. या कर्जाबाबत ऊसतोडणी वाहतूकदार अनभिज्ञ असतानाच अचानक त्यांना कर्जाची परतफेड करण्यासंदर्भात बँकेकडून नोटीस पाठविण्यात आली. त्यानंतर या प्रकाराचा भांडाफोड झाला. ४ आॅगस्ट २०१६ रोजी तांबवे (ता. वाळवा) येथील यशवंत पाटील या वाहतूकदाराने याबाबत कऱ्हाड शहर पोलिसांत फिर्याद दिली. फिर्यादीनुसार तपास सुरू असताना सुरुवातीलाच कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष अविनाश मोहिते व उपाध्यक्ष सुरेश पाटील यांना पोलिसांनी अटक केली. सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी आठ माजी संचालकांनाही पोलिसांनी अटक केली आहे.दरम्यान, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशोक नलवडे हे सध्या मंगळवेढ्यातील दामाजी साखर कारखान्यात कार्यरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक कांबळे यांच्यासह एक पथक बुधवारी मंगळवेढ्याला गेले. सायंकाळी नलवडे यांना तेथून पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा कऱ्हाडात त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.