शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
2
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
3
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
4
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
5
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
6
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा
7
विजेच्या धक्क्याने तडफडत होता मुलगा, लोकांची जवळ जाण्याची होत नव्हती हिंमत, तेवढ्यात एक तरुण धावला आणि...  
8
१० हजारांच्या आत AI, ५जी फोन; सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा पण चकीत केले; कसा आहे A95?
9
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
10
इकडून सोने टाका अन् तिकडून पैसे काढा.. सोने खरेदी-विक्रीसाठी बाजारात आलंय ATM
11
शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं
12
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
13
दुर्दैवी! टॅम्पोचा अपघात; मदत करण्याऐवजी तेल लुटण्यासाठी उडाली झुंबड, क्लिनरचा जागीच मृत्यू
14
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
15
खेळण्यावरून वाद, अवघ्या १३ वर्षांच्या मुलानं धाकट्या बहिणीचा चिरला गळा
16
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
17
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
18
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
19
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
20
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...

..मग वीजदरवाढीचा प्रस्ताव द्या, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:48 IST

स्वत:ची अकार्यक्षमता कशाला लपवता

कोल्हापूर : राज्यात विजेची गळती व चोरीचे प्रमाण १४ टक्के होते. सध्या ते १८ टक्के झाले आहे. महावितरण गळती कमी करण्यासाठी का उपाययोजना करत नाही? तब्बल १५ हजार कोटी रुपये विजेच्या गळती व चोरीमध्ये जातात. स्वत:ची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ग्राहकांवर बोजा टाकणे मान्य नाही. तुम्ही स्वत: कार्यक्षम होऊन गळती, चोरी थांबवा अन् मग ग्राहकांसमोर वीजदरवाढीचा प्रस्ताव घेऊन या, असे आव्हान काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

महावितरणने वीजदरवाढीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाला दिला असून, त्यावरील हरकतींची सुनावणी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात झाली. ऑनलाइन व ऑफलाइन झालेल्या या सुनावणीला सतेज पाटील यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहत वीज बिलांच्या अन्यायी दरवाढीची पोलखोल केली.

आमदार पाटील म्हणाले, कृषिपंपाला साडेसात एच.पी.पर्यंत मोफत वीज देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, पाणीपुरवठा संस्थांच्या माध्यमातून जो वीजपुरवठा होतो. त्याचा त्या संस्थेतील प्रतिसभासद एच. पी. केला तर त्या शेतकऱ्यांवर वीजदरवाढीचा बोजा पडणार आहे. स्वत:ची अकार्यक्षमता लपवण्यासाठी ग्राहकांवर बोजा का टाकता? जनरेशनचा खर्च कमी करण्याची भूमिका तुम्ही का घेत नाही? ग्राहकांकडून काढून घ्यायचे अन् स्वत:चे लपवायचे, हे मान्य नाही, या शब्दांत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. यावेळी आमदार अरुण लाड, माजी आमदार संजय घाटगे, विक्रांत पाटील-किणीकर, भारत पाटील-भुयेकर, बाबासाहेब देवकर, जावेद मोमीन उपस्थित होते.

मग दर कमी का होत नाहीत?सन २०२५ साल पूर्ण झाल्यानंतर सोलरमधून नऊ हजार मेगावॅट वीज तयार होणार असल्याचे सांगितले जाते. जर सोलरमधून इतकी वीज तयार होणार असेल तर मग विजेचे दर कमी का होत नाहीत? रुफटॉप सोलरसाठी कोणत्याही राज्यात टीओडीची अट नसताना ही अट महाराष्ट्राने घातली. कर्ज काढून सोलर बसवायचा, त्याचे व्याज भरायचे अन् परत पंधराशे आणि दोन हजार रुपये बिल भरावे लागत असेल तर याचा उपयोग काय? असा सवालही पाटील यांनी केला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरelectricityवीजmahavitaranमहावितरणSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील