शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

...तर ‘केएमटी’चा पगार आज होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2016 1:03 AM

अनुदानावर भिस्त : थकीत रक्कम ७२ लाख

कोल्हापूर : ‘केएमटी’ कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत पगार देण्याचा निर्णय प्रशासनाने मंगळवारी झालेल्या बैठकीत घेतल्याने कर्मचाऱ्यांचा संप स्थगित करण्यात आला होता; पण महापालिकेकडून आज, सोमवारी विशेष अनुदानाची रक्कम मिळाल्यास कायम चालक व वाहकांचा सुमारे ७२ लाख रुपये जून महिन्याचा थकीत पगार देण्यात येणार असल्याचे ‘केएमटी’ प्रशासनाने सांगितले. पगाराच्या रकमेपोटी ‘केएमटी’ प्रशासनाने महानगरपालिकेकडे सुमारे एक कोटी रुपये विशेष अनुदान मिळावे, अशी मागणी केली होती. ती मागणी महासभेत मान्य करण्यात आली. मंगळवारपासून शनिवारपर्यंत मिळणाऱ्या रोजच्या उत्पन्नातून सुमारे ३८ लाख रुपये काही कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च केले. त्यामध्ये हंगामी कर्मचाऱ्यांचे १६ लाख रुपये व वर्कशॉपमधील कर्मचाऱ्यांचे २२ लाख रुपये पगार देण्यात आला तर कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी चालक व वाहकांचे एकूण ७२ लाख रुपये पगारापोटी देणे बाकी होते; पण के.एम.टी. प्रशासनाकडे पैसे शिल्लक नसल्याने ही थकीत पगाराची रक्कम भागविण्यासाठी महासभेने मान्य केल्याप्रमाणे विशेष अनुदान आज, सोमवारी मिळण्याची शक्यता आहे, हे अनुदान मिळाल्यानंतर जून महिन्याचा थकीत चालकांचा ४० लाख तर वाहकांचा ३२ लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी) ‘भविष्य निर्वाह निधी’बाबत ‘विशेष सभा’ के.एम.टी.तील कर्मचाऱ्यांची कपात करून घेतलेली रक्कम भविष्य निर्वाह निधी कार्यालयाकडे न भरल्याने के.एम.टी.ची बँक आणि इंडिया आणि आयडीबीआय या दोन बँकांतील खाती सीलबंद केली होती; पण के.एम.टी. प्रशासनाने यापैकी काही रक्कम भरल्याने ही करवाई शिथिल करण्यात येऊन खात्यातून दररोज जास्तीत-जास्त १० लाख रुपये काढण्याची मुभा मिळाली होती; पण जादा रक्कम काढण्यासाठी आणखी काही रक्कम ‘त्या’ कार्यालयाकडे भरावी लागणार आहे. याबाबत महापालिकेची ‘विशेष सभा’ घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.