कोल्हापूर : पंतप्रधानांनी ऊसाच्या एफआरपीप्रमाणे पिकांचा हमीभाव हा कायदेशीररित्या बंधनकारक राहील, असा स्पष्ट कायदा करावा व संतापलेल्या बळिराजाला शांत करावे. त्यावर येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानीने मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्यानंतर झालेल्या गोंधळानंतर निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसोा गलांडे यांच्याकडे निवेदन देऊन पंतप्रधानांपर्यंत भावना पोहोचवा, अशी विनंती केली.अमित शहा यांचा निषेधशेतकऱ्यांच्या भावना काय आहेत हे समजून, विश्वासात घेऊन समजून काढणे तर बाजूलाच राहिले आहे, उलट, हे शिखांचे आंदोलन आहे, खलिस्तानवाद्यांचे आंदोलन आहे, अशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्ये करून शेतकरी आंदोलनाना बदनाम केले आहे, याचा तीव्र शब्दांत निषेध आहे, असे शेट्टी यांनी सांगितले.
...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 6:12 PM
Rajushetti, Swabimani Shetkari Sanghatna, collector, kolhapur येत्या दोन दिवसांमध्ये केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला नाही तर देशासह महाराष्ट्रसुद्धा पेटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी सरकारला दिला आहे. स्वाभिमानीचे आजचे आंदोलन ही झलक आहे, केंद्राचे असेच धोरण राहिले तर यापेक्षाही उग्र आंदोलन होईल, असा इशाराही दिला.
ठळक मुद्दे ...तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही : राजू शेट्टी यांचा इशारा स्वाभिमानीचे आजचे आंदोलन झलक, अजून उग्र आंदोलने होणार