मार्केट यार्ड : राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी चालविल्या जात असलेल्या जिल्ह्यातील एकाही निवासी शाळेत मुख्याध्यापक नसल्याने तेथील विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. जिल्ह्यातील मसूदमाले, गगनबावडा, राधानगरी, शिरोळ या चार ठिकाणी अनुसूचित व नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत निवासी शाळा चालविल्या जातात. या प्रत्येक शाळेची पटसंख्या दोनशेच्या आसपास आहे. मात्र, यापैकी एकाही शाळेला मुख्याध्यापक नसल्यामुळे तेथील कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे या शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी होत आहे.
कोट :
सामाजिक न्याय विभागामार्फत जिल्ह्यामध्ये चालविल्या जाणाऱ्या चारही निवासी शाळा मुख्याध्यापकांविना चालविल्या जात आहेत. शासन स्तरावर या प्रश्नाचे गांभीर्य विचारात घेऊन पाठपुरावा सुरू आहे.
विशाल लोंढे,
सहायक आयुक्त,
सामाजिक न्याय विभाग, कोल्हापूर