समीर देशपांडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : गेली अनेक वर्षे वन छायाचित्रण आणि अभ्यासासाठी कार्यरत असलेले रमण कुलकर्णी यांनी कोल्हापूर, महाराष्ट्र आणि गोव्यातील वनवैभवावर अनेक पुस्तकांची वनखात्याच्या सहकार्याने निर्मिती केली आहे. वनछायाचित्रणासाठी झोकून देणारा एक छायाचित्रकार अशी त्यांची ख्याती आहे. एकीकडे पर्यटनासाठी जंगल उपद्रव वाढला असताना कुलकर्णी यांची मते महत्त्वाची वाटतात.प्रश्न - वन्य छायाचित्रण करण्याआधी नेमके काय करीत होता?उत्तर - मी कोल्हापूरचाच. माईसाहेब बावडेकर आणि राजाराम कॉलेजला शिकलो. त्यानंतर कलानिकेतनला डिप्लोमा केला आणि मुंबईला जीडी आर्ट केले. २००४ नंतर कोल्हापुरात आलो आणि डिझायनिंगच्या कामाला सुरुवात केली. त्यामुळे एक डिझायनर म्हणून माझी कारकीर्द सुरू झाली.प्रश्न - वन्य छायाचित्रणाकडे कसे वळलात?उत्तर - मी डिप्लोमा करीत असताना ग्रीन गार्ड संस्थेच्यावतीने १० दिवसांचे निसर्ग प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये मी सहभागी झालो. त्या दरम्यान आम्ही प्रत्यक्ष जंगलामध्ये भटकलो. काही फोटो काढले. या सगळ्यांतून मला वन्य छायाचित्रणाची आवड निर्माण झाली. त्यामुळे आता यासाठी मी महिन्यातून किमान आठ दिवस कुठल्या ना कुठल्या जंगलात असतोच.प्रश्न - कोणत्या विषयांवरील पुस्तके प्रकाशित झाली आहेत?उत्तर - मुळात ही पुस्तके वनखात्याच्यावतीने प्रकाशित करण्यात आली आहेत. यासाठी तत्कालीन अधिकारी जी. साईप्रसाद, एम. के. राव यांचे सहकार्य लाभले. सह्णाद्री व्याघ्र प्रकल्पामधील जैवविविधता, पन्हाळ्याचे पक्षीवैभव, वन्यजीव विभागाचे कॉफीटेबल बुक, गोव्याची जैवविविधता, इको टुरिझम, तिलारी अशा अनेक विषयांवरील पुस्तके तयार करण्यात मला योगदान देता आले आहे.प्रश्न - चित्रफितीही तयार केल्या आहेत का?उत्तर - राधानगरीचे गवे, कोल्हापूरचे वनवैभव, रंगीत सरडा, भोरडी या विषयांवरील चार मिनिटांपासून ते अर्ध्या तासापर्यंतच्या चित्रफिती तयार करण्यात आल्या आहेत.यातील कोल्हापूरचे वनवैभव ही चित्रफीत जिल्हा परिषदेच्या बहुतांशी शाळांना वितरित करण्यात आली आहे.प्रश्न - वन्यजीव छायाचित्रणासाठी काही पुरस्कार मिळाले आहेत का?उत्तर - सॅन्चुरी एशिया या मॅगेझिनने घेतलेल्या बेस्ट वाईल्ड लाईफ फोटो कॉन्टेस्टमध्ये माझ्या बेडकांच्या पिल्लांच्या फोटोला बक्षीस मिळाले होते. तसेच माझी शेकडो छायाचित्रे वनविभागाच्या विविध इमारतींमध्ये तसेच पुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.प्रश्न - सध्या काजवा महोत्सव जाहीर झाला आहे. तुमचे मत काय?उत्तर -कोल्हापूरची मानचिन्हेजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असणाºया जैवविविधता समितीचा मी सदस्य आहे. त्यावेळी बैठकीत मी जशी राष्ट्राची, राज्याची मानचिन्हे असतात, तशी कोल्हापूरची मानचिन्हे निश्चित करावी, अशी सूचना केली होती. ती मान्य होऊन भेरली माड, सोनघंटा, करवंद, गवा, महाधनेश, ग्रेट आॅरेंज टिप, डारविनचा सारगोटा, देवगांडूळ ही पक्षी, प्राणी, वृक्ष, फळ यातील मानचिन्हे निश्चित करण्यात आली.सध्या अनुभवी अधिकारी, कर्मचाऱ्यांची वनखात्याकडे कमतरता आहे. ज्या भागामध्ये जंगल नाही, तेथील काही अधिकारी, कर्मचाºयांकडे जंगल रक्षणाची जबाबदारी आहे. मुळात वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचारी वृक्षतोड, चोरटी शिकार रोखण्यासाठी जंगलात अधिक काळ असणे आवश्यक आहे. मात्र, या मंडळींचा अधिकाधिक वेळ आॅनलाईन आकडेवारी भरण्यामध्ये जात असल्याचे वास्तव दिसून येत आहे. त्यामुळे वनखात्याचा वचक कमी होत आहे. हा वचक पुन्हा निर्माण होणे काळाची गरज आहे.
वनखात्याचा वचक वाढायला हवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 7:10 PM