कोल्हापूर : खासदार संजय मंडलिक यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरुन चर्चेला उधान आले होते. राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री आमदार हसन मुश्रीफ हेच आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार मंडलिक यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगू लागल्या होत्या. यावर माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफांनी आपले मत व्यक्त केलं आहे.कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना मुश्रीफांनी यावर भाष्य केले. ते म्हणाले, मी विधानसभेसाठीच इच्छुक आहे. लोकसभेवर जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.मंडलिकांचे मन वळवण्यात सतेज पाटलांना अपयशयावेळी बोलताना मुश्रीफ म्हणाले की, खासदार संजय मंडलिक यांनी अशी भुमिका घेऊ नये. याबद्दल आम्ही त्यांना बोललो होतो असे सांगितले. यावर त्यांचे मन वळवण्यात अपयश आले का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला असता मुश्रीफ यांनी मला नाही आमदार सतेज पाटील यांना अपयश आले अशी मिश्किल टिप्पणी केली.तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालून गेलेले असेललोकसभा निवडणूक अजून लांब आहे. तोपर्यंत बरेच पाणी पुलाखालुन गेलेले असेल. तेव्हा आता लोकसभा निवडणुकी बद्दल बोलणे घाईचे ठरेल. आमचा पक्ष जो आदेश देईल. तशी आमची भुमिका असेल. माझी पुन्हा आमदार होण्याचीच इच्छा आहे असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
Hasan Mushrif: लोकसभेत जाण्याचा विचार नाही, माजी मंत्री हसन मुश्रीफांनी केलं स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 1:48 PM