शहरं
Join us  
Trending Stories
1
"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 
2
मुंबई मनपा हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, यंत्रणांना सुसज्ज राहण्याचेही निर्देश
3
पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे आदेश
4
नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय
5
पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय
6
जिव्हारी लागलेल्या पराभवानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बारामतीत १४ जुलैला भव्य सभा
7
Rahul Gandhi Manipur Visit: "इथे जे घडत आहे, ते देशात कुठेही पाहिले नाही", मणिपूरमध्ये राहुल गांधींनी घेतली हिंसाचार पीडितांची भेट!
8
'डोनाल्ड ट्रम्प यांचा मीच पराभव करणार', जो बायडेन यांचा उमेदवारी सोडण्यास नकार...
9
कठुआमध्ये लष्कराच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला; चार जवान शहीद, तर चार गंभीर जखमी
10
महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर 
11
वाघ नखांबाबत इतिहासकारांचा खळबळजनक दावा; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका; म्हणाले...
12
"IPLच्या वेळी Hardik Pandya म्हणाला होता- लोकं शिव्या देतायत पण..."; Ishan Kishan ने सांगितली आठवण
13
मुलाच्या लग्नापूर्वी मुकेश अंबानी यांना लागला 14,91,862,00,000 रुपयांचा जॅकपॉट; पाहा...
14
मासिक पाळीत नोकरदार महिलांना सुट्टी? सर्वोच्च न्यायालयाला वाटतेय मोठी भीती, आम्ही आदेश दिला तर...
15
अंडरवर्ल्ड कनेक्शनमुळे बर्बाद झालं या अभिनेत्रींचं करिअर, कोणी देश सोडला, तर कुणी भोगला तुरूंगवास
16
Paris Diamond League : महाराष्ट्राचा 'लेक' काय धावला राव! अविनाशचा नवा रेकॉर्ड; शेतकरी पुत्राची गरूडझेप
17
अंगारकी विनायक चतुर्थीला अद्भूत योग: ‘या’ राशींना उत्तम, लाभच लाभ; गणपती बाप्पा शुभ करेल!
18
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हल्ला, मुलांच्या रुग्णालयासह ५ मोठ्या शहरांना लक्ष्य, २० लोकांचा मृत्यू
19
वेस्ट इंडिजविरूद्धच्या मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर; कर्णधार टेम्बा बवुमाची एन्ट्री
20
नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक अनिल परबांनी लक्षात आणून दिली; म्हणाल्या, "मी अनावधानाने..."

एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर.., आगामी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत सतेज पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

By पोपट केशव पवार | Published: June 24, 2024 2:14 PM

'बिद्री कारखान्यावरील कारवाई चुकीची'

कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागा वाटपावरून कोणताच वाद असणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन पुढे जाऊ. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात जागांवरून कोणतीही अडचण येणार नाही, असा ठाम विश्वास काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.आमदार पाटील म्हणाले, महाविकास आघाडी म्हणून जास्तीत जास्त आमदार निवडून आणणे हे आमचे ध्येय आहे. कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार द्यायचा याचा निर्णय इंडिया आघाडी एकत्रित घेईल. कोल्हापूर जिल्ह्यात जागा वाटपावरून कोणतीही अडचण येणार नाही. एकमेकांना सांभाळून घेऊन आम्ही पुढे जाऊ. एखाद्या पक्षाला एखादी जागा मिळाली तर तो इच्छुक त्या पक्षातून उभा राहील.बिद्रीवरील कारवाई चुकीचीशाहू छत्रपती भुदरगडच्या दौऱ्यावर असताना के. पी. पाटील यांनी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले. त्याचे पडसाद उमटले की नाही हे मला माहीत नाही. मात्र, बिद्रीवरील झालेली कारवाई चुकीची आहे. बिद्री कारखाना ६५ हजार शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकऱ्यांची संस्था अडचणीत आणून कोणी यात राजकारण करत असेल तर ते चुकीचे असल्याचे सांगत आमदार पाटील यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले.प्रत्येक शक्तिपीठाला पाच हजार कोटी द्याशक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारची भूमिका दुटप्पी असून असलेल्या ठिकाणी महामार्ग गरजेचा नाही. सरकारला शक्तिपीठांची इतकीच काळजी असेल तर त्यांनी प्रत्येक शक्तिपीठाला पाच पाच हजार कोटी रुपये देऊन त्या भोवतालचा परिसर विकसित करावा. तिथे येणाऱ्या भाविकांना सुविधा द्याव्यात, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पाहता राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली नसल्याची टीकाही त्यांनी केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटील