कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघात काहीही घोटाळा झालेला नाही, हे चौकशीअंती लक्षात येईल. लेखापरीक्षणात काही झालं तरी आम्हाला क्लीन चीट मिळेल, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या साडेनऊ वर्षात जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांना घालवण्यासाठी सगळे एकत्र आले असले तरी त्याचा काहीही उपयोग होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व सिंचन घोटाळ्याची चौकशी झालेली आहे. दोन्ही प्रकरणात व्यवस्थित क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे आता कोणी काय म्हटले तरी चौकशीचा सवालच राहिलेला नाही. जिल्हास्तरीय संस्थांच्या अहवालात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे फोटो असतात. युती शासनाच्या काळातदेखील अहवालात हे फोटो होतेच.‘गोकुळ’ने यावर्षी फोटो छापले असतील, त्याचा आणि चौकशीचा संबंध जोडणे चुकीचे आहे. ‘गोकुळ’मध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही. लेखापरीक्षणात काही झालं तरी आम्हाला क्लीन चिट मिळेल.‘संयोजक’ पदावरून वादविरोधी आघाडीमध्ये संयोजक पदावरून वाद असल्याचे दिसते. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासाठी काँग्रेस आग्रही असून नितीश कुमार यांच्यासाठी काहीजण आग्रही आहेत. यावरून विरोधी आघाडीचे पुढे काय होईल, हे दिसत असल्याची टीका मंत्री मुश्रीफ यांनी केली.
काँग्रेसची पदयात्रा; निवडणूक तयारीचा भागसर्वच राजकीय पक्ष हे चोवीस तास निवडणुकीच्या तयारीत असतात. निवडणुका जवळ येऊ लागल्या की सर्वच पक्ष पदयात्रांसह इतर कार्यक्रम घेऊन बाहेर पडतात. काँग्रेसची जिल्ह्यातील पदयात्रा त्याचाच भाग असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.