शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणाची मध्यस्थी फळली? हमास-इस्त्रायल युद्ध थांबणार; या छोट्या देशाने निभावली महत्वाची भुमिका
2
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
3
"सरकारी तिजोरीतून ११ कोटी देण्याची गरज काय?"; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर वडेट्टीवारांचा सवाल
4
आजपासून सुरू होणारे नीटचे कौन्सिलिंगची स्थगित; नवीन तारखा लवकरच जाहीर होणार
5
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
6
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
7
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
8
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
9
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
10
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
11
Sanjay Raut : 'आता दाऊदला क्लीन चिट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे, संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
12
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
13
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
14
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
15
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
16
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
17
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
18
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा
19
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
20
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप

पेयजलमधील भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

By admin | Published: January 01, 2017 11:26 PM

सदाभाऊ खोत : चिपरी येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

जयसिंगपूर : अपुऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पेयजल योजना पूर्णत्वासकडे नेणार आहे. अनेक गावांत या योजनेत घोटाळे झाले आहेत. सध्या पाणीपुरवठा व स्वच्छता खाते माझ्याकडे असल्याने ज्यांनी हे घोटाळे केले आहेत, त्यांची गय करणार नाही, असा इशारा राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार असल्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चिपरी (ता. शिरोळ) येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय व बौद्ध समाज मंदिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे, तर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक कोटी रुपयाचा निधी देणार आहे. त्यामुळे तालुका विकासाच्या अव्वलस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत धनपाल कनवाडे, तर प्रस्ताविक सरपंच सुरेश भाटिया यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीता परीट, सावकार मादनाईक, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, पक्षप्रतोत बजरंग खामकर, भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, मनोज राजगिरे, भगवानराव कांबळे, ग्रामसेवक बी. एन. टोणे, शीतल पाटील, अर्चना मरळे, वनिता जगदाळे, मिलिंद जगदाळे, प्रवीण देसाई, जयपाल कोळी, श्रीकांत पवार, रमेश रजपूत, विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभयकुमार पाटील यांनी आभार मानले.चिपरीचा रस्ता करणारचिपरी उद्घाटनप्रसंगी खासदार राजू शेट्टी म्हणाले, खासगी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या अंतर्गत जोड रस्त्यावरील चिपरी गावाचा रस्ता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या गावाच्या चारही बाजूला रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने चिपरी गावाच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री फंडातून सदाभाऊ खोत निधी देणार आहेत. तसेच खासदार फंडातून निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.