शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष मुश्रीफ यांची टीका : ग्रामपंचायतीच्या निकालावर प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 4:26 AM

कोल्हापूर : गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील ...

कोल्हापूर : गावात सत्ता नाही आणि हे कसले प्रदेशाध्यक्ष, असे मी नव्हे तर भाजपचाच एखादा कार्यकर्ता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणू शकतो, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी येथे केली. त्याला संदर्भ होता अर्थातच ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा.

भुदरगड तालुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीत आमदार चंद्रकांत पाटील यांचा पराभव झाला. त्याची सोमवारी निकाल लागल्यापासूनच जिल्ह्यात व माध्यमांवरही जोरदार चर्चा झाली होती. त्यामुळे मुश्रीफ यांना आमदार पाटील यांच्यावर टीका करायला एक आयतीच संधी मिळाली होती. तोच संदर्भ पकडून दुपारी जिल्हा परिषदेच्या सदस्यांशी बोलताना त्यांनी ही संधी साधली. मुश्रीफ यांच्या जिल्हा परिषदेतील भेटीवेळी भाजपचे सदस्यही उपस्थित होते. त्यांनाही मुश्रीफ यांनी प्रत्येकी २५ लाखांचा निधी दिला आणि भाजपचे कारभारी सदस्य विजय भोजे यांच्याकडे पाहून मुश्रीफ म्हणाले, ‘अहो, ते खानापूरच्या निकालाचीच जास्त चर्चा सुरू झाली आहे. कोणत्याही नेत्याच्या गावातल्या पराभवाची चर्चा जास्त होते. आता तुमच्यासारखा कार्यकर्ता असे म्हणू शकतो, की गावात सत्ता नाही, तालुक्यात सत्ता नाही, जिल्ह्यात नाही आणि प्रदेशाध्यक्षपद मात्र आहे.’

मुश्रीफ व आमदार पाटील यांच्यात कायमच राजकीय खेचाखेची सुरू असते. आमदार पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून कुणावरही टीका केली तर त्याला प्रत्युत्तर देण्यात मुश्रीफ हेच पुढे असतात. त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.