लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : आजच्या परिस्थितीत आपल्या शाळा या बंदीशाळा झाल्या आहेत. त्यांना आपण संधीशाळा बनविणे आवश्यक आहे. आपली ओळख भूतकाळात शोधायची नसून ती भविष्यकाळात घडवायची आहे, असे प्रतिपादन एमकेसीएलचे कार्यकारी संचालक व संशोधक विवेक सावंत यांनी केले.येथील नाट्यगृहात झालेल्या मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत ‘ज्ञानयुगात भारताची झेप, संधी आणि आव्हाने’ यावर ते बोलत होते. सावंत यांनी दोन तासांच्या ओघवत्या भाषणात दहा हजार वर्षापूर्वीच्या जीवनशैलीने सुरूवात केली.पहिल्या, दुसऱ्या औद्योगिक क्रांतीत काय घडले, हे सांगितल्यानंतर तिसऱ्या औद्योगिक क्रांतीतील हेन्री फोर्ड यांचे त्यांनी उदाहरण दिले. तो, उत्पादन विक्री व सेवा अशा टप्प्यांतील माहिती विकसित करण्याचे काम करीत असे आणि त्याची माहिती आयबीएम कॉम्प्युटरवर साठवून ठेवण्यात येईल. चौथ्या क्रांतीच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत. यातून एक जीवनशैली निर्माण होणार आहे. फिजिकल वर्ल्ड, डिजिटल वर्ल्ड आणि बायॉलॉजिकल वर्ल्ड याचा अपूर्व संगम होऊन आता काही चिप्स आपल्या शरीरात बसणार आहेत. नवे बौद्धिक स्वामित्व हक्क निर्माण होणार आहेत. म्हणूनच संघटित होऊन क्रांतीचे अग्रदूत व्हा, असा सल्ला सावंत यांनी दिला.संजय होगाडे यांनी स्वागत केले. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले.
बंदीशाळांना संधीशाळा बनवायला हवे
By admin | Published: May 17, 2017 11:10 PM