झाडांचा वाढदिवस साजरा
उचगाव : पर्यावरणाचे रक्षण व्हावे, वृक्ष संगोपनाबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी गेली १३ वर्षे उचगावचे श्री मंगेश्वर ग्रुपचे माजी सरपंच पै. मधुकर चव्हाण व ग्रुपचे सदस्य झाडांचा वाढदिवस उत्साहाने आणि आपुलकीने साजरा करतात. त्यांचे हे कार्य उल्लेखनीय आहे, असे मत आम. ऋतुराज पाटील यांनी केले.
उचगाव (ता. करवीर) येथील श्री मंगेश्वर ग्रुपच्या वतीने आयोजित झाडांचा वाढदिवस या उपक्रमात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी सरपंच मधुकर चव्हाण होते. आम. पाटील पुढे म्हणाले की, कोरोनाच्या संकटकाळामध्ये निसर्गामध्ये मोफत उपलब्ध 'ऑक्सिजन'ची खऱ्या अर्थाने किंमत कळली आहे. याचसोबत ग्लोबल वॉर्मिंगचे संकट दिवसेंदिवस गडद होत आहे. यावर वृक्षारोपण व वृक्ष संगोपन हाच पर्याय आहे. पालकमंत्री सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापुरात जास्तीत जास्त वृक्षारोपण करून त्या झाडांचे संवर्धन करण्यावर माझा भर आहे.
उचगाव गावातील कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या कोरोना योद्धयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच मालुताई गणेश काळे, माजी सरपंच गणेश काळे, माजी सरपंच मधुकर चव्हाण-पैलवान, कावजी कदम, पं. स. सदस्य सुनील पोवार, सपोनि दीपक भांडवलकर, अशोक निगडे, उपसरपंच मधुकर चव्हाण, प्रदीप बागडी, महेश खांडेकर, राजू पोवर, पांडुरंग साळोखे, महेश जाधव, गोपी मणेर, कीर्ती मसुटे, श्रीकांत दळवी, करण चव्हाण, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो ओळ:उचगाव येथील श्री मंगेश्वर ग्रुपच्या वतीने झाडांचा वाढदिवस केक कापून कापताना आम. ऋतुराज पाटील, माजी सरपंच मधुकर चव्हाण, सरपंच मालूताई काळे, सपोनि दीपक भांडवलकर, आदी.