कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातून सुरू करण्यात आलेल्या नेशन फाॅर फार्मर्स या समूहाच्या आता विभागवार समित्याही तयार करण्यात येणार आहेत. याबाब शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता होणाऱ्या ऑनलाइन बैठकीमध्ये निर्णय घेतले जाणार आहेत. मेघा पानसरे, रसिया पडळकर, आदित्य खेबुडकर हे या उपक्रमाचे निमंत्रक आहेत.
दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळावा यासाठी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी नेशन फॉर फार्मर्स चळवळीची कोल्हापुरात सुरुवात करण्यात आली आहे. त्याच्या विभागवार समित्या तयार करण्याबरोबरच १८ जानेवारी रोजी देशपातळीवर महिला शेतकरी दिन साजरा केला जाणार आहे. याबाबतही नियोजन करण्यात येणार आहे. तसेच २४, २५ जानेवारीला मुंबई येथील ठिय्या आंदोलनासही कशा पद्धतीने पाठिंबा द्यायचा याचाही निर्णय घेण्यात येणार आहे.