शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
2
गजकेसरी, लक्ष्मी नारायण राजयोगात अक्षय्य तृतीया: ८ राशींना अक्षय्य लाभ, यश-प्रगती; शुभ घडेल!
3
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
4
बीडमध्ये महिला वकिलाला वळ उठेपर्यंत मारहाण! काँग्रेसचे सरकारला चॅलेंज- "पूर्णवेळ गृहमंत्री असेल तर..."
5
Sant Dnyaneshwaranchi Muktai Review : मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली..., जाणून घ्या कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई'
6
IPL 2025 : शाळेत अतिरिक्त गुण मिळवण्यासाठी अमरावतीचा पठ्ठ्या क्रिकेट संघात शिरला अन् मग जे घडलं ते...
7
क्रेडिट कार्ड की पर्सनल लोन... तुमच्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा? ही आहे सोपी पद्धत
8
Astro Tips: लक्ष्मीकृपेसाठी शुक्रवारी संध्याकाळी तुळशीजवळ 'या' पाचपैकी एक वस्तू ठेवाच!
9
जन्मताच पैसे कमवायला सुरुवात! वर्षात ११ कोटींची कमाई; १७ महिन्यांचे बाळ २१४ कोटींचे मालक
10
आता या सगळ्यांना पोहोचवण्याची वेळ आलेली आहे! मृत्यूच्या खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर भडकले आदेश बांदेकर
11
मराठी अभिनेत्रीने सांगितला विराट कोहलीसोबत शूटिंगचा अनुभव, म्हणाल्या, "माझ्या मुलीसाठी त्याने..."
12
केएल राहुल-अथिया शेट्टीच्या लेकीचं झालं बारसं! नाव काय ठेवलं माहितीये? शब्दाला आहे खास अर्थ
13
सोन्याच्या किमतीचा नवा विक्रम! १० ग्रॅमसाठी तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घ्या
14
"क्रिकेटपटूंनी विवस्त्र फोटो पाठवले, शिविगाळ केली, एकाने तर…’’, मुलगी बनलेल्या अनाया बांगरचे सनसनाटी आरोप 
15
सासू जावयानंतर आता बिर्याणीवाला...; कामावर ठेवलेला पोरगाच मालकाच्या पत्नीला पळवून घेऊन गेला
16
बदल्याची आग! उपचाराच्या बिलामुळे झाला कर्जबाजारी, रुग्णालयात चोरी करणारा हायटेक चोर
17
एसबीआयमध्ये १००००० रुपयांवर मिळतंय २४,६०४ चे निश्चित व्याज; एफडीचा कालवधी किती?
18
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
19
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
20
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग

जुन्या चालेनात, नव्यांची भर; कोल्हापूर जिल्ह्यात नव्याने होणार आठ बाजार समित्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 17:17 IST

कोल्हापूर : प्रत्येक तालुक्याला बाजार समिती या धोरणानुसार ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजना’मधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना नवीन बाजार समित्या मंजूर ...

कोल्हापूर : प्रत्येक तालुक्याला बाजार समिती या धोरणानुसार ‘मुख्यमंत्री बाजार समिती योजना’मधून जिल्ह्यातील आठ तालुक्यांना नवीन बाजार समित्या मंजूर झाल्या आहेत. यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी, कागल, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड, चंदगड आणि आजरा तालुक्याचा समावेश आहे. सहकार, पणन विभागाने शुक्रवारी याबाबतचा शासन आदेश काढला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्चमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केली होती. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व कृषि मालाच्या वितरणाकरिता एकाच ठिकाणी सुविधा, सोय व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्याला कृषि उत्पन्न बाजार समिती आवश्यक असल्याचे शासनाचे मत होते. परंतु, राज्यातील ३५८ तालुक्यांपैकी ६८ तालुक्यांमध्ये बाजार समित्या अस्तित्वात नव्हत्या. त्यामुळे प्रत्येक तालुक्याला बाजार समिती, असे धोरण शासनाने ठरवले आणि त्यानुसार हा शासन आदेश काढण्यात आला आहे.

सध्या कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करवीर, पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी, गगनबावडा, भुदरगड आणि अर्धा कागल तालुका समाविष्ट आहे. गडहिंग्लज बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात गडहिंग्लज, आजरा, चंदगड आणि अर्धा कागल तालुका समाविष्ट आहे. हातकणंगले तालुक्यासाठी वडगाव बाजार समिती तर शिरोळ तालुक्यासाठी जयसिंगपूर बाजार समिती आहेत. त्यामुळे आता या नव्या शासन निर्णयानुसार कोल्हापूर आणि गडहिंग्लज बाजार समितीमधून हे सर्व तालुके वगळून प्रत्येक तालुक्याला नवीन बाजार समिती स्थापन होणार आहे.

किमान १० ते १५ एकर जागा आवश्यकजिल्ह्यातील या नव्याने स्थापन होणाऱ्या बाजार समितीसाठी किमान १० आणि कमाल १५ एकर जागा आवश्यक असल्याचे शासन आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रत्येक तालुकास्तरावर आता या जागेचा शोध सहकार विभागाला घ्यावा लागणार आहे.

कशासाठी अट्टाहाससध्याच्या बाजार समित्या तोट्यात चालल्या असताना, तिथल्या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसताना, तेथील मुलभूत सोयी सुविधांसाठी बाजार समित्यांकडे निधी उपलब्ध नसताना या प्रत्येक तालुक्याला नव्या बाजार समित्यांचा अट्टाहास कशासाठी असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMarket Yardमार्केट यार्ड