बाजीराव जठार वाघापूर : श्रीक्षेत्र आदमापूर (ता.भुदरगड) येथील सद्गुरु बाळूमामांच्या वार्षिक भंडारा उत्सवात जागरा दिवशी आज, शनिवारी पहाटे संत बाळूमामा मंदिरा समोर भाकणूक (भविष्यवाणी ) संपन्न झाली. कृष्णात डोणे वाघापूरकर यांनी ही भाकणूक केली. या मराठी वर्षातील ही शेवटची अन् महत्वाची भाकणूक असल्याने काय भविष्य कथन होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. भाकणूकप्रसंगी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, राजस्थान, आंध्रप्रदेश मधील हजारो भाविकांची उपस्थिती होती.संत बाळूमामा मंदिरा समोर केलेल्या भाकणूकीचा(भविष्यवाणी ) गोषवारा असा :भारत पाकिस्तानच्या सीमेवर छुपे युद्ध सुरू राहील. चीनचा भारतावर हल्ला होईल. कोरिया, चीन देश जगासाठी क्लेशदायक ठरतील. भारतावर आक्रमण करतील. भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील. विजयी पताका फडकवतील. तिरंगा ध्वज आनंदात राहील, अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील. हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील. हिंदू धर्माला चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.कोरिया, चीन देश जगासाठी घातक ठरतील. भारत-पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील. शहरे उध्वस्त होतील. चीन देश भारतावर आक्रमण करेल. भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील. भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील. युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागेल. दुनिया पेटेल. काळरात्र येईल सावध रहा.राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतीलदेश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. राजकारणी नेतेमंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील. राजकारणी सत्ता संपत्तीच्या मागे लागतील. सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील, पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही. राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील. दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल. राज्याच्या राजकारणात गोंधळ होईल. सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील. राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील. नेतेमंडळी तुरुंगात जातीलभ्रष्टाचार उदंड होईल. नेतेमंडळी तुंरुगात जातील. महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ होईल. २०२४ मध्ये राजकीय लोक या पक्षातून त्या पक्षात उड्या मारतील. सीमा भागात मोठा गोंधळ होईल. गुंडाचे राज्य येईल. जातीयवाचक राजकारणाला ऊत येईल. जातीयवादी राजकारण सुरू होईल. जगात डोंगरा एवढं पाप वाढले आहे. दोऱ्याएवढेच पुण्य शिल्लक आहे. कोल्हापूरच्या देवीच्या डोळ्यातून पाणी येतयकोल्हापूरच्या देवीला स्वप्न पडलय. तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतय. चंद्र सुर्याची टक्कर लागेल. तीन दिवसरात्र जगात अंधार होईल. साताऱ्याच्या गादीवर फूले पडतील. सत्यानं वागा. गर्वाने वागाल तर फसाल. वारा वावटळ उदंड होतील. काळ्या खडकाच्या लाह्या होतील. विजेने मोठे नुकसान होईल. बाळूमामांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल. दुनियेत नवल होईल. तरूण पिढी वाममार्गाला लागेल. रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील. नितीमत्ता बाळगा. पाच बोटाने धर्म करा. धर्माची बाजू पुढे न्ह्या.दागिने पैसे फुकाचे…तीन महिन्याचे धान्य पिकेल. खरीप बहुत होईल. तांबडे रास मध्यंतरी पांढर धान्य उदंड पिकेल. गवताची पेंडी मध्यम राहील. धान्य दारात वैरण घरात ठेवाल. धान्य महागेल. जगणं मुश्कील होईल. ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल. तांबे लोखंड मोलाचे होईल. शेतीचा भाव वाढत जाईल. पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल. माणूस कागदाचा घोडा नाचवेल. दागिने पैसे फुकाचे होतील. वैरणीचा भाव वाढत जाईल. वैरण धान्याच्या चोरी होतील, सांभाळून ठेवा. तांबडी रास मध्यम पीकेल. पांढर धान्य मोलाने विकेल. बैलांची किंमत बकऱ्याला, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल. बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल.
नदीला कुलुपे पडतील…मनुष्य जंगलात जाईल, जंगलातील पशूधन गावात येईल. वाड्यावस्त्या ओस पडतील. मेघाची वाट पहाल. पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल. पाण्याचा कप विकत मिळेल. कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठे भगदाड पडेल. भुभाग जलमय होईल. नदीला कुलपे पडतील. पाण्यासाठी मोठी आंदोलने होतील. सागरी संपत्तीचा नाश होईल. ऊन्ह्याळाचा पावसाळा होईल. धर्माचा पाऊस कर्माचा होईल. पाण्याचा कप विकत मिळेल.मनुष्याला अठरा तऱ्हेचा आजार होईल. डॉक्टर हात टेकतील. ऊसाचा काऊस होईल. साखरेचा दर कमीजास्त राहील. शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदी राहील. साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील. ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजेल. शेतकरी चिंतेत राहील. मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल. विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरेल. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल. आगामी काळात पृथ्वी सोडून मनुष्य पर ग्रहावर राहायला जाईल. बाळुमामा शेषनागाचा अवतार हाय. या गावात मी निशाण रोवलंय, माझ ठाण मांडलय. बाळूमामांचा त्रिभुवनात जयजयकार होणार.
आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईलआदमापुर बाळुमामांची पवित्र भुमी हाय. या गावाचा महिमा जगात वाढेल. आदमापूरचे श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर होईल. एकीन वागा. राजकारण आणशीला, करशीला तर माझ्याशी गाठ आहे. पिवळ्या भस्माचा महिमा अगाध राहील. भगवा झेंडा राज्य करेल, मिरवेल. कोल्हापूरचे राजघराणे क्षत्रिय वंशाचे आहे. धर्माची गादी आहे. तिला रामराम करा. आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील.