जयसिंगपूर : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय व नागरिकांच्या मनातील भीती दूर व्हावी म्हणून वन रुपी क्लीनिक मुंबई यांच्यावतीने घरोघरी जाऊन नागरिकांचे थर्मल टेस्टिंग केले जाणार आहे.आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या संकल्पनेतून राजेंद्र पाटील सोशल फाउंडेशन च्या वतीने शिरोळ तालुक्यामध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे. आज ( मंगळवार) पासून जयसिंगपुरात या उपक्रमाला सुरुवात होणार आहे.फाउंडेशन नेहमीच सामाजिक बांधीलकीतून काम करीत आहे.आपत्तीच्या काळात नागरिकांच्या मदत कार्यात फांऊडेशनचे कार्यकर्ते सक्रीय असतात.महापुरासारख्या आपत्तीत नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे राहणारे फाऊडेशनने आता कोरोनाच्या संकटसमयी तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
मुंबईमधील वैद्यकीय पथकाच्या सहकार्यातून शिरोळ तालुक्यातील नागरिकांचे होणार थर्मल टेस्टिंग केली जाणार आहे.
जयसिंगपुरातून ही आरोग्य तपासणी मोहीम सुरू होणार आहे. नागरिकांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याचे तपासणी करून घेऊन या पथकाला सहकार्य करावे असे आवाहन, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.