शहरं
Join us  
Trending Stories
1
यासीन मलिकच्या पत्नीचं राहुल गांधींना पत्र; "जम्मू काश्मीरातील शांततेसाठी..."
2
१२ बेरोजगार तरुणांच्या खात्यात अचानक १२५ कोटींची उलाढाल, नाशिकमध्ये काय घडलं?
3
"जे मविआच्या उमेदवारांविरोधात उभे, त्यांना..."; काँग्रेसने बंडखोरांबद्दल घेतला निर्णय
4
सलमाननंतर आता शाहरुख खानला जीवे मारण्याची धमकी; पोलिसांनी कॉल केला ट्रेस
5
"मला धमकावलं जातंय...", साक्षी मलिकचं PM मोदींना कुस्ती वाचवण्याचं आवाहन
6
सदाभाऊंना कुत्रा म्हणणाऱ्या संजय राऊतांना नितेश राणेंनी दिली अशी उपमा, म्हणाले... 
7
विरोध डावलून नवाब मलिकांना उमेदवारी दिली, आता प्रचारही करणार का? अजित पवारांचे सूचक विधान
8
धनंजय मुंडे यांच्या संगनमताने करोडोची जमीन अल्प किंमतीत विकून फसविले: सारंगी महाजन
9
Maharashtra Election 2024: देवेंद्र फडणवीस, बावनकुळेंसह दिग्गजांची परीक्षा! काँग्रेसचे आव्हान कसे पेलणार?
10
सदाभाऊ खोतांच्या विधानावर संजय राऊतांचा संताप; देवेंद्र फडणवीसांवर टीका करत म्हणाले...
11
बस चालवताना ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक; कंडक्टरच्या प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव
12
"प्रमोद महाजनांच्या हत्येमागं मोठं षडयंत्र, दोन्ही भावांमध्ये भांडण नव्हतं"; पूनम महाजनांचे मोठं वक्तव्य
13
"त्रेता युगात इस्लाम नावाची कुठली वस्तूच या पृथ्वीवर नव्हती..."; अमरावतीत काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
14
अजय देवगण अन् 'भूल भूलैय्या ३'च्या दिग्दर्शकाचा १० वर्ष रखडलेला सिनेमा, 'नाम'ला अखेर मिळाली रिलीज डेट
15
श्रेयस अय्यरचे द्विशतक! मुंबईचा संकटमोचक सुस्साट; अजिंक्य रहाणेच्या संघाने धावांचा डोंगर उभारला
16
२०१९ मधील वचननामा, संकल्पपत्र, जाहीरनामा; किती घोषणा पूर्ण झाल्या? तुम्हीच ठरवा
17
"जिवंत राहिले तर जरूर कोर्टात जाईन", वॉरंट मिळाल्यानंतर प्रज्ञा सिंह ठाकूर यांची पोस्ट!
18
ODI मॅचमध्ये गल्ली क्रिकेटमधील सीन; कॅप्टनसोबत भांडण अन् गोलंदाजानं सोडलं मैदान (VIDEO)
19
Bigg Boss 18: 'वीकेंड का वार'मध्ये दिसणार नाही भाईजान, सलमानच्या जागी 'हे' दोन सेलिब्रिटी असणार होस्ट
20
Chitra Wagh : “राहुल गांधी तुम्हाला संविधान म्हणजे पोरखेळ वाटला का?”; भाजपाच्या चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल

त्यांना सैन्यातही दोस्तीची आशा..!

By admin | Published: February 10, 2015 10:59 PM

सांगलीतील तिघा तरूणांची अनोखी कहाणी

रत्नागिरी : सांगली जिल्ह्यातील वळसंग गावात वाढलेले तीन मित्र. त्यातील एक मित्र उर्वरित दोघांपेक्षाही खूपच लहान, तरीही एकाच गावातील म्हणून त्यांच्यात मैत्री झाली आणि रत्नागिरीतील महासैन्यभरती मेळाव्यापर्यंत ती टिकून राहिली आणि ही मैत्री सैन्यातही रहावी, अशी या तिघांना आशा आहे.बसुराज माळी, धुंडाप्पा कबाडगे, राहुल पुजारी हे ते तिघे मित्र! हे तिघेही वळसंग (सांगली) गावातील. त्यातील राहुल हा अकरावीत शिकतोय, उर्वरित दोघेही बी.ए.चे विद्यार्थी आहेत. तरीही या तिघांची दोस्ती झाली ती सैन्यात जाण्याच्या इच्छेने! या गावातील १५-२० लोक भारतीय सैन्यात आहेत. या तिघांनीही सैन्यात जायचं ठरवलं. १३ तारखेला भरती प्रक्रिया आहे, असं कळलं आणि दोन दिवस अगोदरच या तिघांनीही रत्नागिरी गाठली. हे तिघेही गरीबच आहेत, तरीही तिघांनी एकत्र येऊन स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.बसुराज माळी हा बी.ए.च्या व्दितीय वर्षात शिकत आहे. १२ एकर शेती आहे. त्यामध्ये काळं रान (ज्वारी) पिकतं. मात्र, ते उत्पन्न कुटुंबाचा डोेलारा सावरू शकत नाही, अशी स्थिती आहे. बसुराजला सैन्यात भरती होण्याची आवड आहे. त्यामुळे या बसुराजने रत्नागिरी गाठली.धुंडाप्पा हाही बी.ए.चाच विद्यार्थी. त्याचे मामा हे सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार! त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकूनच आपण मोठे झाल्याचे धुंडाप्पा सांगतो. ज्वारी, बाजरीच्या शेतीवर कुटुंबांची गुजराण चालते, पण तेथेही तारेवरची कसरतच! लहानपणापासूनच युध्दाच्या कथा ऐकल्याने सैन्याबाबत उत्सुकता आहे, असे धुंडाप्पा सांगतो. राहुल हा अकरावी आर्टस्चा विद्यार्थी. आपण दहावी परिक्षा उत्तीर्ण झाल्यावरच सैन्यात जाण्याचा विचार केल्याचे राहुल सांगतो. आपल्याला देशसेवेची इच्छा आहेच, परंतु नोकरीचीही गरज आहे, असे तो म्हणाला. वळसंगसारख्या एका गावात जन्मलेली या तिघा दोस्तांची मैत्री आता रत्नागिरीच्या महासैन्यभरतीपर्यंत येऊन पोहोचली आहे. आता सगळ्यांची भरतीमध्ये निवड होऊन ती भारतीय सैनिकांच्या छावणीपर्यंत पोहोचावी, अशा या तिघांचीही इच्छा आहे. (प्रतिनिधी)त्यांना सैन्यातही दोस्तीची आशा..!सांगलीतील तिघा तरूणांची अनोखी कहाणीरत्नागिरी : सांगली जिल्ह्यातील वळसंग गावात वाढलेले तीन मित्र. त्यातील एक मित्र उर्वरित दोघांपेक्षाही खूपच लहान, तरीही एकाच गावातील म्हणून त्यांच्यात मैत्री झाली आणि रत्नागिरीतील महासैन्यभरती मेळाव्यापर्यंत ती टिकून राहिली आणि ही मैत्री सैन्यातही रहावी, अशी या तिघांना आशा आहे.बसुराज माळी, धुंडाप्पा कबाडगे, राहुल पुजारी हे ते तिघे मित्र! हे तिघेही वळसंग (सांगली) गावातील. त्यातील राहुल हा अकरावीत शिकतोय, उर्वरित दोघेही बी.ए.चे विद्यार्थी आहेत. तरीही या तिघांची दोस्ती झाली ती सैन्यात जाण्याच्या इच्छेने! या गावातील १५-२० लोक भारतीय सैन्यात आहेत. या तिघांनीही सैन्यात जायचं ठरवलं. १३ तारखेला भरती प्रक्रिया आहे, असं कळलं आणि दोन दिवस अगोदरच या तिघांनीही रत्नागिरी गाठली. हे तिघेही गरीबच आहेत, तरीही तिघांनी एकत्र येऊन स्वप्नाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.बसुराज माळी हा बी.ए.च्या व्दितीय वर्षात शिकत आहे. १२ एकर शेती आहे. त्यामध्ये काळं रान (ज्वारी) पिकतं. मात्र, ते उत्पन्न कुटुंबाचा डोेलारा सावरू शकत नाही, अशी स्थिती आहे. बसुराजला सैन्यात भरती होण्याची आवड आहे. त्यामुळे या बसुराजने रत्नागिरी गाठली.धुंडाप्पा हाही बी.ए.चाच विद्यार्थी. त्याचे मामा हे सैन्यातून निवृत्त झालेले हवालदार! त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकूनच आपण मोठे झाल्याचे धुंडाप्पा सांगतो. ज्वारी, बाजरीच्या शेतीवर कुटुंबांची गुजराण चालते, पण तेथेही तारेवरची कसरतच! लहानपणापासूनच युध्दाच्या कथा ऐकल्याने सैन्याबाबत उत्सुकता आहे, असे धुंडाप्पा सांगतो. राहुल हा अकरावी आर्टस्चा विद्यार्थी. आपण दहावी परिक्षा उत्तीर्ण झाल्यावरच सैन्यात जाण्याचा विचार केल्याचे राहुल सांगतो. आपल्याला देशसेवेची इच्छा आहेच, परंतु नोकरीचीही गरज आहे, असे तो म्हणाला. वळसंगसारख्या एका गावात जन्मलेली या तिघा दोस्तांची मैत्री आता रत्नागिरीच्या महासैन्यभरतीपर्यंत येऊन पोहोचली आहे. आता सगळ्यांची भरतीमध्ये निवड होऊन ती भारतीय सैनिकांच्या छावणीपर्यंत पोहोचावी, अशा या तिघांचीही इच्छा आहे. (प्रतिनिधी)रत्नागिरीतच जमली मैत्रीराहुल कांबळे, मु.पो. खुपिरे, ता.करवीर, जिल्हा कोल्हापूर व रोहित पाटील, मु.पो. कळे परखंदळी, ता. पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. दोघेही अनोळखी. पण रत्नागिरीत आले अन् ते एकाच जिल्ह्याचे असल्याने त्यांच्यात मैत्री जमली. रोहितने यापूर्वी एकदा सैनिकी परीक्षा दिली आहे. त्यावेळी आलेलं अपयश धुवून काढायचं असल्याचं तो सांगतो. राहुल कांबळे याच्यासाठी ही पहिलीच सैन्यभरती आहे. मात्र याठिकाणी मिळालेला अनुभवही माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, असे राहुल सांगतो. या दोघांनाही रत्नागिरीतील सैन्यभरतीने मित्र बनवले आहे.वडगावची तरूणाई भरतीतरत्नागिरीतील या महासैन्यभरती मेळाव्यात दऱ्याचे वडगाव, पाचगाव (कोल्हापूर) येथील आठ ते दहा तरूण सामील झाले आहेत. या साऱ्यांनी आजपर्यंत एकत्रच सराव केला आहे. यापूर्वी आपण सैन्यभरतीत सामील झालो होतो. पण आजपर्यंत निवड झालेली नाही. आता यश मिळेपर्यंत थांबणार नाही, विश्रांती घेणार नाही, असे हे तरूण सांगतात. धनाजी बोडके, अजित बोडके, विजय बोडके, विशाल जमदाडे, दयानंद जमदाडे, प्रवीण शेवडे, गजानन चव्हाण, रमेश हिंदुळे, स्वरूप शिंदे, सिध्दार्थ बुधवण अशी त्यांची नावे आहेत. या साऱ्यांनी सैन्यभरती मेळाव्यासाठी रत्नागिरीत येण्याचाही निर्णय एकमुखाने घेतला आणि या सैन्यभरतीत ते सहभागी होणार आहेत.छोट्या भावाला शेती देण्यासाठी...!रत्नागिरी : गरिबी आणि दारिद्र्य हातात हात घालून घरात असल्यानंतर शिक्षण कसं होणार? तरीही तीन एकराच्या शेतीवर उपजीविका करून एक कुटुंब जगतंय. एवढंच नव्हे तर छोट्या भावाकडे शेती सोपवण्याचा निर्णय घेऊन तो सैन्यात दाखल होण्यासाठी निघालाय. त्याची जिद्द एवढी आहे की, तो सैनिकीची जेडी परीक्षा उत्तीर्णही झालाय.वैभव तुकाराम सावंत. प्रथम वर्ष बी.ए.मध्ये शिकणारा विद्यार्थी. मु. पो. दसूर, माळशिरस, जिल्हा सोलापूर. घरची तीन एकर शेती हेच त्यांच्या गुजराणीचं साधन. नाही म्हणायला घरी ४ जनावरं आहेत. घरी लहान भाऊ, मोठी बहीण आणि आई वडील एवढं कुटुंब. मोठी बहीण फार्मसी शिकतेय. शेतीतून खर्च भागत नसल्याने या वयातच वैभवला जाण आहे ती कुटुंबाला सावरण्याची. त्याला वाटतंय की, लहान भावासाठी आपण ‘बाहेर’ पडावं. सैन्यात भरती व्हावं. वैभव सांगतो, नोकरी आणि देशसेवा हे दोन्ही हेतू आहेत.धाकट्या भावाकडे शेती सोपवून माझा सैन्यात जाण्याचा निश्चय आहे. त्याची जबाबदारी मी स्वीकारणार आहे. देशसेवा हा हेतू आहेच, पण त्याहीपेक्षा मी कमावता झालो तरच भावाला शेतात जाता येईल, यादृष्टीने मी सैन्यभरतीकडे वळलोय, असे तो म्हणाला.त्याने सैनिकी सेवेतील जेडी परीक्षा पार केली आहे. आता वैद्यकीय चाचणी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झाला की, त्याची सैन्यात भरती होईल. सोलापूर येथे एका खासगी क्लासमध्ये गेले काही महिने तो या लेखी परीक्षेसाठी विशेष तयारी करतो आहे. (प्रतिनिधी)मारीता मारीता मरेतो झुंजेन...मला २६/११च्या हल्यापासूनच दहशतवादाचा प्रचंड राग आहे. मी सैन्यात भरती झालो आणि संधी मिळाली तर देशाच्या शत्रूंना मी कंठस्नान घालेनच आणि जीवाची बाजी लावून देशसेवा करेन.-वैभव सावंत, उमेदवार