कोल्हापूर : शिंगणापूर परिसरात रविवारी सकाळी आढळलेले तीन गवे सोमवारी पहाटे जंगलात परतले असल्याची माहिती करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे यांनी दिली.शिंगणापूर परिसरात उसाच्या शेतात तीन गवे आढळले होते. दोनच दिवसांपूवी लक्षतीर्थ वसाहत व उत्तरेश्वर पेठेत पाच गव्यांचा शेतात मुक्काम होता. दरम्यान, शिंगणापूर परिसरात तीन गवे रविवारी दिवसभर उसाच्या शेतात आढळून आले होते. दोन मादी गव्यांसह तीन गवे या ठिकाणी होते. करवीर वन विभागाच्या दोन पथकाला या गव्यांना पहाटे अडीच वाजण्याच्यासुमारास जंगलाकडे परत पाठविण्यास यश आले. या पथकामध्ये वीसजणांचा समावेश होता.उपवनसंरक्षक आर. आर. काळे, करवीरचे वन अधिकारी सुधीर सोनावणे, वनपाल प्रवीण पाटील, वनपाल घनश्याम भोसले, वन्यजीव संक्रमण व उपचार केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संतोष वाळवेकर यांच्यासह त्यांचे आठजणांचे पथक, वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲन्ड रिसर्च सोसायटीचे पाचजण, बावडा रेस्क्यू फोर्सचे पाचजण तसेच सह्याद्री डिझास्टर, करनूरचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्यासह व्हाईट आर्मीच्या जवानांनी प्रयत्न करून या गव्यांना जंगलाकडे परत पाठविण्याची कामगिरी यशस्वीपणे पार पाडली. दिवसभरात परत गवे आढळले नसल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.स्थानिकांचे सहकार्यया गव्यांना जंगलात परत पाठविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी वन विभागाला सहकार्य केले. सरपंच तसेच शेतकऱ्यांनी सहकार्याचा हात दिला. गवे दिसल्यास वन विभागाला तत्काळ कळविण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
शिंगणापूर परिसरातील ते गवे जंगलात परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 7:24 PM
forest department kolhapur- शिंगणापूर परिसरात रविवारी सकाळी आढळलेले तीन गवे सोमवारी पहाटे जंगलात परतले असल्याची माहिती करवीरचे वनक्षेत्रपाल सुधीर सोनावणे यांनी दिली.
ठळक मुद्देशिंगणापूर परिसरातील ते गवे जंगलात परतलेस्थानिक नागरिकांचे वन विभागाला सहकार्य