शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

कोल्हापुरात शिवाजी पेठेत चोरट्यांनी भरदिवसा फ्लॅट फोडला, साडेतीन तोळे दागिने लंपास

By उद्धव गोडसे | Published: March 13, 2024 1:50 PM

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले

कोल्हापूर : शिवाजी पेठेतील सरनाईक कॉलनीत शुक्रतारा हाईट्समधील एक फ्लॅट फोडून चोरट्यांनी एक लाख १५ हजार रुपये किमतीचे साडेतीन तोळ्यांचे दागिने लंपास केले. याच इमारतीमधील दुसरा फ्लॅट फोडण्याचा प्रयत्न करून चोरटे पळाले. याबाबत अनिता अनिल काशीकर (वय ६५, रा. शुक्रतारा हाईट्स, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मंगळवारी (दि. १२) दुपारी दीड ते सव्वादोनच्या सुमारास हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली.याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी दुपारी फिर्यादी काशीकर काही कामानिमित्त फ्लॅट बंद करून बाहेर गेल्या होत्या. परत आल्यानंतर त्यांना त्यांच्या ३०४ क्रमांकाच्या फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहिले असता, गेस्ट रुममधील कपाटातील सोन्याचा हार, कानातील कुड्या, सोन्याचे मणी आणि तुकडे असा साडेतीन तोळ्यांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले.अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोन चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून चोरी केल्याचे स्पष्ट झाले. काळा टी शर्ट आणि पांढरा टी शर्ट घातलेले अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील दोन चोरटे फुटेजमध्ये दिसत आहेत. याच चोरट्यांनी ६०४ क्रमांकाच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केल्याचा उल्लेख काशीकर यांनी फिर्यादीत केला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस