शहरं
Join us  
Trending Stories
1
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
4
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
6
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
7
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
8
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
9
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
10
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
11
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
12
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
13
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
14
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
15
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
17
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
18
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
19
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
20
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण

चोर, गस्त अन् अफवांचा बाजार

By admin | Published: August 05, 2015 12:38 AM

भीतीचे वातावरण : ग्रामस्थांच्या गस्ती वाढल्या, चोर सोडून सामान्यांवर हल्ले, पोलिसांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न

कोल्हापूर : चोरीच्या घटना घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात, विशेषत: ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परप्रांतीय चोरांच्या टोळ्या जिल्ह्यात शिरकाव करत असल्याच्या अफवा पसरत आहेत. छोट्या-मोठ्या चोरींच्या घटनासह घरांवर दगड पडणे, शिवारात एकटया महीलेला गाठून तिच्या गळ्यातील गंठण चोरण आदी प्रकारही ग्रामीण भागात घडू लागले आहेत. रात्रीसह दिवसाही शिवारात जाण्यासाठी शेतमजूर घाबरु लागले. त्यामुळे रात्रीच्यावेळी नागरीक हातात काठ्या घेऊन ग्रुपने गस्ती घालू लागले. या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या कार्यक्षमतेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. रात्रीचे गस्त घालणारे पोलिस फिरणाऱ्या पोलीस गाड्या काय करतात? असाही प्रश्न नागरीकांतून विचारला जात आहे. या वातावरणात गस्ती घालणाऱ्या काही नागरीकांकडून चोर समजून सामान्य नागरीकांवरही हल्ले होण्याचे प्रकार घडू लागले आहे. गेले पंधरा ते वीस दिवस नागरीकांच्या गस्ती वाढू लागल्या, चोर काही सापडेनात पण यामध्ये काहींचे बळी जाऊन अनेकांचे सामाजिक स्वास्थ बिघडत निघाले आहे. ‘व्हॉटसअप’चा धुमाकूळचोरींच्या घटनांबाबत अफवांचा बाजार पसरवायला व्हॉटसअप या सोशल साईटचा मोठा हातभार आहे. कोणीही कोठूनही उठतो आणि काहीही व्हॉटसअपवर टाकतो, क्षणाधार्थ ही ‘बातमी’ अनलिमिटेड हातात जावून धडकते. यात आणखी जरा भर टाकून त्याला तिखट मिठ लावून ही सनसनाटी बातमी फॉरवर्ड केली जाते. त्यामुळे चोरींच्या घटनांबाबत सत्य कमी आणि अफवाच जास्त असे चित्र दिसत आहे. लोकांनी अशा अफवांना स्वत:ही बळी पडू नये आणि आलेल्या अफवा पुढेही पसरवू नयेत. किमान एव्हढी खबरदारी घेतली तर मोठा अनर्थ टळू शकेल. केर्लीत चोर समजून पोलिसाच्या गाडीवर हल्ला कोल्हापूर : चोरीच्या घटनांनी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सोमवारी (दि. ३) रात्री रत्नागिरीहून कोल्हापूरमार्गे सांगलीला जाणाऱ्या एका पोलिसाच्या व्हॅनवर केर्ली फाटा येथे रात्रगस्त घालणाऱ्या ग्रामस्थांनी चोर समजून हल्ला केला. गाडीचे नुकसान झाले. याप्रकरणी कॉन्स्टेबल सुधीर शंकर माने (वय ३३, रा. रत्नागिरी) यांनी करवीर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार २० पेक्षा जास्त ग्रामस्थांवर गुन्हा दाखल केला. दोन दिवसांपूर्वी वडणगे शेतात काम करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील गंठण हिसकावून नेण्याचा प्रयत्न झाला. रात्री-अपरात्री वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. ग्रामस्थांच्या हातांमध्ये तलवारी, कुऱ्हाडी, काठ्या व दगड पाहून प्रवासी भीतीने गाड्या न थांबविता निघून जात आहेत. दरम्यान, सोमवारी मध्यरात्री केर्ली गावचे ग्रामस्थ रात्रग्रस्त घालीत होते. पहाटेच्या सुमारास रत्नागिरी पोलीस मुख्यालय येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल सुधीर माने हे कुटुंबासह ओम्नी व्हॅनमधून कोल्हापूरमार्गे सांगलीला जात होते. यावेळी ग्रामस्थांनी त्यांची व्हॅन अडविण्याचा प्रयत्न केला. अंधारात रस्त्यावर दहा ते बाराजणांचे टोळके, हातांमध्ये शस्त्रे पाहून माने यांनी गाडी न थांबविता वेगाने तेथून जाण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी चोर समजून त्यांच्या गाडीवर दगड व काठ्यांनी हल्ला चढविला. माने यांचे कुटुंबीय भयभीत झाले. त्यांनी तेथून गाडी थेट करवीर पोलीस ठाण्यात आणली. चोरांच्या भीतीने महिलेचा बळीकुशिरे येथे दुर्घटना : पळताना शेतमजूर महिला पडली विहिरीतपोहाळे तर्फ आळते : ‘चोर आले... चोर आले... पळा पळा’ असा अचानकपणे गोंधळ झाला आणि शेतात भांगलण करणाऱ्या महिला भीतीने पळत सुटल्या आणि एका महिलेचा विहिरीत पडून मृत्यू झाला. ही घटना कुशिरे तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे दुपारी तीन वाजता घडली. सौ. अस्मिता कृष्णात चोरगे (वय २८) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. तर दुसरी महिला जागीच बेशुद्ध पडली. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कुशिरे येथील बाबासोा कृष्णात पाटील यांच्या सोनार मळ््याच्या शेतात मंगळवारी दहा ते बारा महिला रोजंदारीने भाताच्या शेतात भांगलण करण्यासाठी गेल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास शेजारील शेतात अचानकपणे एका महिलेच्या पाठीत दगड पडला. त्यामुळे त्या महिलेने चोर...चोर.. असा दंगा केला. भांगलण करण्यात गुंग असणाऱ्या महिला सैरावैरा पळत सुटल्या. त्याच शेतात पाटील यांनी गेल्या वर्षी विहीर खोदली आहे. पण त्या विहिरीला अद्याप कसलाही सुरक्षित कठडा नाही. जमीन व विहीर दोन्ही सपाट आहे. त्यामुळे अस्मिता यांना ही विहीर दिसली नाही. त्या पळतच विहिरीत पडल्या. ही घटना सर्व महिलांना समजली. त्यांनी आरडाओरडा केला, विहिरीत दोरी टाकली, पण काही उपयोग झाला नाही. अस्मिता चोरगे यांच्या घरची परिस्थिती गरिबीची असून, त्यांचे पती कृष्णात चोरगे हे कुशिरे येथील औद्योगिक कारखान्यात खासगी नोकरीत आहेत. त्यांना दोन लहान मुले आहेत. एक मुलगा बालवाडीत व दुसरा मुलगा पहिलीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. त्याच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे असा परिवार आहे. दरम्यान, कोडोली पोलीस स्टेशनचे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊ न पंचनामा केला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)कुशिरे येथील डोंगर पायथ्याच्या परिसरात दोन अज्ञात व्यक्ती असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.भांगलण करण्यासाठी गेलेली एक महिला घटनास्थळीच बेशुद्ध पडली होती. रात्री उशिरापर्यंत ती खासगी दवाखान्यात बेशुद्धच होती.गेल्या आठवड्यांपासून गावात चोर आल्याच्या भीतीने ग्रामस्थ हैराण आहेत. रात्रभर युवकांकडून गस्त घातली जात आहे. हळदीत महिलेच्या वेशातील चोरट्यास चोपहळदी : हळदी (ता. करवीर) येथे सोमवारी रात्री चोरीचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे फसला. एका चोराला हळदी गावात अनोळखी फिरत असताना चोप दिला; परंतु ग्रामस्थांच्या हातून तो निसटून पळून गेला. तर चार ते पाच घरांवर दगडफेक केली. हळदी परिसरात चोऱ्या होत असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. मात्र, इस्पुर्ली पोलिसात फोन करूनसुद्धा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ नाराज आहेत.कोल्हापूर-राधानगरी रोडवरील हळदी (ता. करवीर) येथे एका घरासमोर महिलेच्या वेशातील व्यक्ती संशयित फिरताना काहींना रात्री १२ वा. दिसली. त्या व्यक्तीवर तरुणांनी पाळत ठेवली. याचदरम्यान नामदेव कांबळे यांच्यासह पाचजणांच्या घरांवर दगडफेक केली. त्या संशयित व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडले व बेदम चोप दिला. यावेळी या चोराने चक्क जीन्स पँट व टी शर्ट परिधान केला होता व वर साडी परिधान केली होती. हे ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यावर ग्रामस्थांनी अधिकच चोप दिला; हा चोर अंधाराचा फायदा घेऊन ऊसशेतात पळून गेला. ग्रामस्थांनी शोधाशोध केली; तो सापडला नाही.हा प्रकार घडल्यानंतर ग्रामपंचायतीच्या स्पीकरवरून याबाबत दवंडी दिली. (वार्ताहर)यड्रावमध्ये घरांवर दगड पडण्याचे प्रकारयड्राव : येथील बेघर वसाहत, गावठाण व गावभाग परिसरातील घरांवर रात्रीच्या सुमारास दगड पडण्याचे प्रकार सुरू आहेत. काही घरांची कौले फुटून बालके जखमी होण्याच्या गावात घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर युवकांनी गस्त घालण्यास सुरुवात केली.कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही चोरांचा सुळसुळाट नाही. वडणगे, आंबेवाडी, केर्ली, बालिंगा, दोनवडे, आदी परिसरांत चोरांचा वावर असल्याची अफवा आहे. त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, ग्रामस्थांनी गावात रात्रग्रस्त घालू नये, रस्त्यावर धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या ग्रामस्थांवर येथून पुढे गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांची रात्रगस्त सुरू आहे. नागरिकांच्या संरक्षणाची आमची जबाबदारी आहे. संशयितरित्या व्यक्ती दिसल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. - डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक