शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

कोल्हापुरात तिसऱ्यांदा ‘ग्रीन कॉरिडॉर’;तिघांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 1:14 AM

कोल्हापूर : मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे त्याच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी राबविली. धनंजय बापूसाहेब जामदार (वय ६१, रा. कसबेकर पार्क, महावीर महाविद्यालयानजीक) असे या मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून, त्यांची एक किडनी आणि यकृत ‘ग्रीन ...

कोल्हापूर : मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे त्याच्या नातेवाइकांच्या इच्छेनुसार यकृत व दोन किडन्या असे एकूण तीन अवयव दान करण्याची शस्त्रक्रिया कोल्हापुरातील डायमंड हॉस्पिटलमध्ये रविवारी दुपारी राबविली. धनंजय बापूसाहेब जामदार (वय ६१, रा. कसबेकर पार्क, महावीर महाविद्यालयानजीक) असे या मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे नाव असून, त्यांची एक किडनी आणि यकृत ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पुण्यातील संबंधित रुग्णालयाकडे पाठविले. यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवून रस्ते वाहतुकीपासून रिकामे केले होते.कसबेकर पार्क येथील धनंजय जामदार (वय ६१) यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याने त्यांना शुक्रवारी (दि. १४) डायमंड हॉस्पिटलमध्ये दाखल केले. शनिवारी (दि. १५) सायंकाळी डॉक्टरांनी त्यांचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केले. त्यानंतर जामदार यांच्या पत्नी रोहिणी जामदार, मुलगा निखिल, मुलगी नेहा मराठे यांच्याशी डॉक्टरांनी चर्चा केली. त्यांनी अवयवदानाची तयारी दर्शविली. दरम्यान, सकाळी पुण्यातील संबंधित रुग्णालयातील रुग्णवाहिका हॉस्पिलमध्ये दाखल झाल्या. जामदार यांच्यावर शस्त्रक्रिया करून त्यांच्यातील एका किडनीचे ‘डायमंड’मध्येच रुग्णाला प्रत्यारोपण केले. तर ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे दुसरी किडनी आणि यकृत पुण्याकडे पाठविले. हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. कौस्तुभ औरंगाबादकर, अतिदक्षता तज्ज्ञ डॉ. साईप्रसाद, किडनी स्पेशालिस्ट डॉ. विलास नाईक यांनी ही शस्त्रक्रिया राबविली.अवयव परजिल्ह्णातदुपारी साडेचार वाजता शस्त्रक्रियेनंतर एक किडनी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये, तर यकृत हे पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील रिसर्च सेंटरकडे ‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे पाठविले. तेथे त्यांचे गरजू रुग्णावर प्रत्यारोपण केले. अवयव घेऊन रुग्णवाहिकेने जिल्हाधिकारी कार्यालय, धैर्यप्रसाद हॉल, ताराराणी चौक, तावडे हॉटेलमार्गे राष्टÑीय महामार्गावरून पुण्याकडे प्रयाण केले.तिसरी घटना‘ग्रीन कॉरिडॉर’द्वारे अवयव परजिल्ह्णात पाठविण्याची कोल्हापुरातील ही तिसरी घटना होय. यापूर्वी दि. ५ मे रोजी अमर पांडुरंग पाटील (रा. निगवे), दि. १४ जुलै रोजी गुंजन बसराणी (रा. कोल्हापूर) या मेंदू मृत झालेल्या रुग्णाची अवयवदानाची शस्त्रक्रिया राबविली होती. त्यानंतर रविवारी डायमंड हॉस्पिटलमध्ये प्रथमच ही शस्त्रक्रिया केली.वडिलांचेही देहदानअवयवदान केलेले धनंजय जामदार हे युनायटेड इंडिया अ‍ॅश्युरन्स येथून सेवानिवृत्त झाले आहेत; तर त्यांचे वडील कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सचिव बी. डी. जामदार यांनीही १ जानेवारी २०१३ रोजी इच्छेनुसार मरणोत्तर देहदान केले होते; त्यामुळे त्यांनी वडिलांचा आदर्श कायम ठेवला.