शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
3
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
4
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
6
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
7
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
8
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
9
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
10
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोल्हापूरच्या दिग्दर्शकाच्या 'नजरिया'ला देशविदेशातील तब्बल १३ पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2022 4:44 PM

अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या हिंदी लघुपटात वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सेजल कोरे हिची भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.

कोल्हापूर : शाहुवाडी तालुक्यातील सरुड गावचे रहिवासी किरण पोटे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नजरिया' या अवयवदानाविषयी जनजागृती करणाऱ्या हिंदी लघुपटाला देशविदेशातील विविध महोत्सवांत तेरा पुरस्कार मिळालेले आहेत. विशेष म्हणजे कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्याची मुलगी सेजल कोरे हिची यातील भूमिका कौतुकास पात्र ठरली आहे.सरुड येथील भूमीहीन कुटुंबातील दिग्दर्शक किरण पोटे यांनी विविध छोट्यामोठ्या नोकऱ्या करत अभिरुची नाट्य संस्थेकडून राज्यनाट्य स्पर्धा, एकांकिका, पथनाट्यात अभिनय केला. २००९ पासून मुंबईत सिनेमा, मालिकेत छोट्या भूमिका करत लेखन, दिग्दर्शन ते पोस्ट प्रॉडक्शनपर्यंतच्या कामाचा अनुभव मिळवला.सर्वप्रथम २०१९ मध्ये 'कल्टी' या त्यांच्या पहिला चित्रपटाला दादासाहेब फाळके गोल्डन कॅमेरा ॲवार्ड मिळाला. याच वर्षी उद्यमनगरातील चिंध्या विकणाऱ्या महिलांच्या 'चिंध्या' या लघुपटाला चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०२२ मध्ये त्यांच्या 'नजरिया' या हिंदी लघुुपटाला विविध महोत्सवांत तेरा पुरस्कार मिळविले. या लघुपटात कैलास वाघमारे, प्रमोद शिंदे, मिलिंद ओक, बाजीराव गवळी, मारुती माळी, संतू पाटील, योजना खैरे, योगेश सोमण यांच्या भूमिका आहेत.

वृत्तपत्र विक्रेत्याच्या मुलीने जिंकले मन

कोल्हापुरातील वृत्तपत्रविक्रेते सागर कोरे यांची कन्या सेजलने या लघुपटात प्रमुख भूमिका केली आहे. तिच्या पहिल्याच भूमिकेने चाहत्यांची मने जिंकली. सागर कोरे शिवाजी पेठ, मंगळवार पेठेत सकाळी वृत्तपत्र पोहचवून दिवसभर रिक्षा चालवतात. त्यांची कन्या सेजलने आता पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये पाचवीत प्रवेश घेतला आहे.

मिळालेले पुरस्कार : लॉस एंजलिसमध्ये बेस्ट इन्स्पिरिशनल शॉर्ट फिल्म, ब्लॅक स्वॅन इंटरनॅशनलमध्ये बेस्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट सोशल फिल्म, बेस्ट ड्रॅमॅटिक आर्ट फिल्म, स्पेशल ज्युरी पुरस्कार, रामेश्वरम इंटरनॅशनलमध्ये बेस्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, गोल्डन हॉर्स इंटरनॅशनलमध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म,

इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म आणि बेस्ट शॉर्ट फिल्म ऑन डिसॲबिलिटी इश्यू, आय इनसायनिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ॲस्पायरियंग डिरेक्टर व बेस्ट कन्सेप्ट, शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले व इंडियन फिल्म मेकर्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये बेस्ट ॲस्पायरिंग डिरेक्टर असे तेरा पुरस्कार या लघुपटाला मिळालेले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर