कोल्हापूर : काेल्हापुरचा शाही दसरा राज्य शासनाने राज्य महोत्सव घोषीत केला असून यंदा १५ ते २४ ऑक्टोबर होणाऱ्या या महोत्सवांतर्गत ९ दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या परिषदेत शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण झाले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.महोत्सवाची सुरुवात घटस्थापनेपासून (दि. १५) होणार असून त्या दिवशी पागा इमारतीतील पर्यटन परिचय केंद्र व पर्यटन प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे. येथे पर्यटन स्थळांचे महत्व व माहिती देणारे प्रदर्शन व कायम स्वरुपी माहिती केंद्र सुरु करण्यात येत आहे. त्यानंतर ९ दिवस दसरा चौकासह शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. दसऱ्यादिवशी पारंपारिक कलांच्या सादरीकरणाने अंबाबाई पालखीचे व न्यू पॅलेस येथून शाहू छत्रपतींचे स्वागत केले जाणार आहे.
नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे भराकोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून खर्च करावयाच्या विकास निधीच्या खर्चाचे नियोजन फेब्रुवारी अखेर करा, अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या. दरम्यान शहरातील रस्त्यांसाठी भरीव निधी देऊन रस्ते चकाचक करू, असे सांगितले. तोपर्यंत नवरात्र उत्सव सुरू होण्यापूर्वी शहरातील खड्डे भरण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.