शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कोल्हापुरात यंदा ४१ फूट पाणीपातळीलाच पन्हाळा रस्ता पाण्यात, आपत्ती व्यवस्थापनाकडूनही अभ्यास सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 1:55 PM

कारणे काय..?.. जाणून घ्या

कोल्हापूर : याआधी २०१९ आणि २०२१ मधील पुराच्या वेळी जेव्हा पंचगंगा नदीची राजाराम पातळीवरील पातळी ४३ फूट अशी धोक्याची होती त्याचवेळी पन्हाळा रस्त्यावर पाणी आले होते. परंतु, यंदा यात मोठा फरक पडला असून, ही पातळी ४१ फुटांवर असतानाच पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागही याचा अभ्यास करीत आहे.सन २००० नंतर आलेल्या तीनही पुरांमध्ये कोल्हापूर जिल्ह्यात मोठे नुकसान झाले होते. जीवितहानी आणि मोठ्या प्रमाणावर पशुधनाची हानी झाली होती. पंचगंगेची राजाराम बंधाऱ्याची पातळी जेव्हा ३९ फुटांवर असते तेव्हा ती ‘इशारा पातळी’ मानली जाते. त्यामुळे या पातळीवर पाणी गेले की प्रशासन अलर्ट मोडवर येते. नागरिकांनाही या पाणीपातळीची माहिती असल्याने सुतार मळा, शाहूपुरीतील कुंभार गल्ली, बापट कॅम्प, कसबा बावड्याकडील नदीकाठचा परिसर या सगळ्यांनी कधी घराबाहेर पडायचे हे ठरवलेले असते. चिखली, आंबेवाडीचे ग्रामस्थही पूर्वानुभवावरून याबाबत निर्णय घेतात.परंतु, यावेळी ४३ फुटांवर पाणी येण्याआधीच ते राजाराम बंधाऱ्यावर ४१ फुटांवर असतानाच कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर पाणी आले आहे. हाच हिशोब लावला तर जो राष्ट्रीय महामार्ग याआधीच्या महापुरावेळी ५० फुटांची पातळी असताना बुडाला होता तो ४८ फुटांच्या पातळीवरच बुडू शकतो. ही शक्यता गृहीत धरून आपत्ती व्यवस्थापन विभागदेखील वेगळ्या पद्धतीने याचा हिशोब लावू पाहत आहे.

कारणे काय..?महापूर आला, नुकसान झाले की कोल्हापूरला ब्लू लाइन, रेडझोनची आठवण येते. त्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी होते. त्यावर चर्चाही झडतात. परंतु, पूर ओसरला, पाणी कमी झाले की मागील पानांवरून पुढे असा अनुभव नेहमीच येतो. त्यामुळे नदीपात्रालगतच टोलेजंग इमारती उभारल्या जात आहेत. जिथे नवीन पुलांचे बांधकाम होत आहे, तिथे मुरुमांचे ढीग ओतून रस्ते उंच केले जात आहेत. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक निचरा होण्यास अडचणी येत असल्याने पुराचे पाणी तुंबून राहत आहे. परंतु, त्यापासून आपण आजपर्यंत काही धडा घेतलेला नाही, यापुढेही काही घेऊ असे वाटत नाही.रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरजजिल्ह्याच्या विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दिवसरात्र पाऊस सुरू आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर १४ तासांनी हे पाणी कोल्हापुरात पोहोचते. त्यामुळे या सोडलेल्या पाण्याचा नेमका परिणाम हा शुक्रवारी पहाटे जाणवणार आहे. परंतु, कोल्हापूर शहरासह सर्वत्र पाऊस असल्याने याआधी मध्यरात्री नागरिकांना हलवताना प्रचंड तणाव प्रशासनावरही आला होता आणि नागरिकही त्यावेळी अडचणीत आले होते. हा अनुभव लक्षात घेऊन नागरिक आणि प्रशासनाने रात्रीच्या वेळी सजग राहण्याची गरज आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही याच मुद्द्यावर भर दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूरroad transportरस्ते वाहतूक