शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

भोगावती नदीत हजारो मासे मेले

By admin | Published: February 06, 2015 1:01 AM

रसायनमिश्रित पाण्याने प्रदूषण : रसायन कोणी सोडले हेच कळेना; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

कोल्हापूर / सडोली (खालसा) : ट्रॅक्टरद्वारे हळदी परिसरात ओतलेले रसायनमिश्रित पाणी भोगावती नदीत मिसळल्याने हळदी (ता. करवीर) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यानजीक पाणी दूषित झाल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाण्यावर मृत माशांचा खच लागला. मेलेले मासे गोळा करून नेण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांची झुंबड उडाली. गेल्या २२ डिसेंबरलाही असाच प्रकार होऊन हजारो मासे मेले होते; परंतु ते कशामुळे मेले, याचा शोध प्रदूषण नियंत्रण मंडळास आजपर्यंत लागलेला नाही. बुधवारीच उच्च न्यायालयाने पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणांना अपयश आल्याबद्दल फटकारले असतानाच भोगावती नदीचे प्रदूषण झाल्याने लोकांतूनही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. परंतु, प्रदूषण कशामुळे झाले हेच प्रदूषण नियंत्रण मंडळास समजत नाही, हीच खरी गंमत असल्याची टीका लोकांतून होत आहे. हळदी (ता. करवीर) येथे बंधाऱ्यातील पाण्याला दुर्गंधी येऊन गेले दोन दिवस दूषित बनले. बुधवारी रात्रीपासून हजारो मृत मासे पाण्यावर तरंगताना दिसल्याने गुरुवारी सकाळी बंधाऱ्यावर ते पाहण्यासाठी व पकडण्यासाठी गर्दी उसळली. काठीने व बंदुकीने मासे मारून लोकांनी ते घरी नेले. अनेकांनी पोत्यात भरून मासे नेले. ही माहिती प्रदूषण मंडळाला समजताच प्रदूषण मंडळाचे अधिकारी एस. एस. डोके व न्यायालयाने स्थापन केलेल्या ‘निरी’च्या पथकाने नदी व ओढ्याच्या पाण्याचे नमुने घेतले. हळदी व कुर्डू परिसरातील अनेक शेतकरी रसायनमिश्रित पाण्याचे टँकर शेतात ओततात. हे रसायनमिश्रित पाणी ओढा व नदीत मिसळते. शेतकऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे नदीचे पाणी दूषित होण्याचा प्रकार वारंवार होत आहे; पण प्रदूषण मंडळ मात्र कारवाईस विलंब करीत आहे. टँकर कुणाचे व गेले कुठे...गेल्या २२ डिसेंबरला जेव्हा असेच प्रदूषण झाले तेव्हा भोगावती कारखान्याच्या डिस्टिलरीतून तीन टँकर मळी बाहेर गेल्याची नोंद झाली होती; परंतु ते टँकर कुठे गेले याचा शोध आतापर्यंत लागलेला नाही. मळीमिश्रित पाणी शेतीला घातल्यावर मुरमाड जमिनीतील खडक फुटतो, अशी शेतकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे ते असले विषारी पाणी शेतीला घालत असल्याचे पुढे आले आहे.जिल्हाधिकारी काय करणार..?उच्च न्यायालयाने पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती नियुक्ती केली आहे. त्याचे जिल्हाधिकारी राजाराम माने हे देखील सदस्य आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचीही तितकीच जबाबदारी आहे. त्यामुळे प्रदूषित घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनीच आता आदेश देण्याची गरज आहे.भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे दूषित पाणी जादा दाबाने सोडल्याने हेच पाणी हळदी बंधाऱ्याच्या खाली गेल्यामुळे बंधाऱ्याखालील गावांनाही पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार आहेत.पिण्याचा प्रश्न गंभीरनदीत रसायनमिश्रित पाणी मिसळल्याने काठावरील कुरुकली, हळदी, देवाळे, कोथळी, कुरुकली गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला. प्रदूषणाची तीव्रता कमी होण्यास तीन दिवस जातात. तोपर्यंत पाण्यासाठी वणवण करावी लागणार.नदीपात्रातील पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी चिपळूणला पाठविण्यात येतील. अहवाल प्राप्तीनंतर जबाबदार असणाऱ्या घटकांवर कारवाई करू. प्रदूषण नेमके कशामुळे झाले व कुणी केले हे सांगणेच अवघड बनले.- एस. एस. डोके, प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ पंचगंगा नदीची मुख्य उपवाहिनी असलेल्या भोगावती नदीचे गुरुवारी मळीमिश्रित पाण्यामुळे पुन्हा प्रदूषण झाले. त्यामुळे माशांचा श्वास गुदमरल्याने हजारो मासे मेले. अनेक मासे आॅक्सिजनसाठी पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तडफडत होते. ते पकडण्यासाठी पंचक्रोशीतील लोकांची हळदी (ता. करवीर) येथील बंधारा व नदी काठावर अक्षरक्ष: झुंबड उडाली होती. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एस. एस. डोके यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाण्याची तपासणी करून नमुने घेतले.