दत्तात्रय धडेलजोतिबा : जोतिबा डोंगरावर वर्षारंभीच्या रविवारी भाविकांची जोतिबा दर्शना साठी लांबच लांब लागली दर्शन रांग लागली होती. जोतिबा देवाचा वार, वर्षाचा पहिला दिवस रविवार , सलग सुट्टीच्या त्रिवेणी योगामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली .
नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने करण्यासाठी भाविकांनी तीर्थ क्षेत्री भेटी दिल्या . जोतिबा डोंगरावर वर्षाचा पहिला रविवार आणि पहिला दिवस असल्याने जोतिबा दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली . येणारे नुतन वर्ष कोरोना मुक्त व सुख समुद्धीचे जावो अशी प्रार्थना देवासमोर करीत होते . सकाळ पासुनच दर्शनाच्या लांबच लांब दर्शन रांगा लागल्या होत्या . मंदिर बाहेरील ठाकरे मिटके गल्लीपर्यंत दर्शन रांग लागली होती .
एकाच दरवाज्यातुन मंदिर प्रवेशामुळे उत्तर दरवाज्यावर मोठी गर्दी झाली होती . जोतिबा देवाची नवीन वर्षारंभी निमित्त आकर्षक पुजा बांधली होती . सकाळी ११ वाजता धुपारती सोहळा मंदिर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडला .भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची उधळण करून चांगभलं चा गजर केला . पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती . वाहनाच्या घाटमार्गातून रांगा लागल्या होत्या .