शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

‘प्रोत्साहन’ अनुदान: नियमित परतफेड करणारे शेतकरी लाडके कधी होणार?

By राजाराम लोंढे | Published: August 23, 2024 3:51 PM

११ हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण : पाच वर्षे योजनेचे नुसते गुऱ्हाळच

राजाराम लोंढेकोल्हापूर : राज्य शासनाने एकीकडे लोकप्रिय योजनांचा धडाका लावला असताना ‘प्रोत्साहन अनुदाना’ची पंचवार्षिक योजना काही संपण्याचे नाव घेत नाही. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा होऊन पाच वर्षे झाली तरी गुऱ्हाळ काही संपत नाही. प्रोत्साहन अनुदानापासून अजून हजारो शेतकरी वंचित राहिले असून, विकास संस्था, बँकांच्या चकरा मारून ते थकले असून, शेतकरी मुख्यमंत्र्यांचे लाडके कधी होणार? असा सवाल केला जात आहे.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घाेषणा केली. यामध्ये दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करत असतानाच दोन लाखांपेक्षा अधिक थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी ही योजना आणली होती. त्याचबरोबर पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतची ‘प्रोत्साहनपर अनुदान’ योजना आणली.ज्या शेतकऱ्यांनी २०१७-१८ ते २०१९-२० या तीन आर्थिक वर्षात दोन वर्षे नियमित परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना २०१९-२० च्या कर्ज उचलीवर अनुदान दिले जाते. या योजनेसाठी जिल्ह्यातून ३ लाख ८८५ खातेदारांनी अर्ज केले होते. निकषानुसार १ लाख ७७ हजार ७९० शेतकऱ्यांना ६४६.३६ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळाले.

कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी हे ऊसउत्पादक आहेत. त्यामुळे पीक कर्जाची उचल आणि परतफेड ही साखर कारखान्यांच्या गळीत हंगामावर अवलंबून असते. त्यामुळे एकाच वर्षात दोनवेळा उचल दिसते, या तांत्रिक मुद्यामुळे १४ हजार शेतकरी अपात्र ठरले होते. शासनाने निकषात शिथिलता आणत, एकाच वर्षात दोनवेळा उचल केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील १४ हजारांपैकी ११ हजार ६३ शेतकरी पात्र ठरले. या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरणही पूर्ण झाले आहे; पण पैसे आलेले नाहीत. या शेतकऱ्यांसह तांत्रिक बाबींमुळे वंचित राहिलेले शेतकरी अस्वस्थ आहेत. पाच वर्षे पैशांच्या प्रतीक्षेत, त्यातील काहीजणांचा मृत्यूही झाला आहे.शासन एकीकडे ‘मुख्यमंत्री : माझी लाडकी बहीण’ व ‘वयोश्री’ योजनेसारखा धडाका लावला आहे. संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर महिन्याभरात पैसे वर्ग झाले, मग प्रोत्साहन अनुदानातील शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठीच शासनाकडे निधी नाही का? असा सवाल शेतकरी करत आहेत.

वित्तीय संस्थांच्या वसुलीवर परिणाम?

गेली पाच वर्षे प्रोत्साहन अनुदानाचे गुऱ्हाळ सुरू आहे. एखादी योजना किती वर्षे सुरू ठेवावी, याची काही मर्यादा असते; पण पाच वर्षे योजना सुरू ठेवली आहे. प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करूनही पैसे न मिळाल्याने थकवलेलेच बरे, अशी मानसिकता काही शेतकऱ्यांची झाल्याने वित्तीय संस्थांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.

दृष्टिक्षेपात प्रोत्साहन अनुदान योजना :

  • एकूण अर्ज दाखल : ३,००,८८५
  • पात्र : २,११,४२१
  • प्रमाणीकरण पूर्ण : २,०९,९३७
  • अनुदान मिळालेले : १,७७,७९०
  • रक्कम : ६४६.३६ कोटी
  • निकष शिथिल केल्यानंतर पात्र : ११,०६३
टॅग्स :kolhapurकोल्हापूरFarmerशेतकरी