कोल्हापूर : कोल्हापूरकरांसाठी आजचा रविवार ऐतिहासिक ठरणार आहे. सळसळता उत्साह असणाºया हजारो धावपटूंच्या सहभागामुळे येथील रस्ते ओसंडून वाहणार आहेत. निमित्त आहे, ‘राजुरी स्टील’प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथान’चे. पोलीस ग्राउंड येथून आज, रविवारी सकाळी ६ वाजता महामॅरेथॉनचा फ्लॅग आॅफ होईल.
महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेल्या धावपटूंचा सहभाग तसेच सर्व संरक्षक दले, पोलीस, होमगार्ड आणि विशेष दलांतील धावपटूंसाठी दिले जाणारे विशेष बक्षीस हेदेखील प्रमुख वैशिष्ट्य आहे. २१ कि.मी. (अर्धमॅरेथॉन), १० कि.मी. (पॉवर रन), शिवाय ५ कि.मी. (फॅमिली रन) व ३ कि.मी.ची (फन रन) अशा गटांत मॅरेथॉन होत आहे. ‘लोकमत’ समूहाने यंदा महाराष्ट्रात चार शहरांत महामॅरेथॉनचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नाशिक, त्यानंतर औरंगाबाद, नागपूर व आता कोल्हापुरात आज हा थरार रंगणार आहे. यामध्ये हजारो धावपटूंनी सहभाग निश्चित केला आहे. कोल्हापुरात होणारी ही महामॅरेथॉन नागरिक आणि खेळाडूंसाठी एक संस्मरणीय अनुभव ठरणार आहे. या स्पर्धेसाठी मी धावतो..माझ्यासाठी हे ब्रीद आहे. यानिमित्ताने आपल्या शरीराकडे, आरोग्याकडे, क्षमतेकडे लक्ष वेधण्याचा मॅरेथॉनचा हेतू आहे. मुली, महिला तरुण-तरुणींसह विविध शाळांतील मुलेही सहभागी होणार आहेतच शिवाय कित्येकजण धावपटूंचा उत्साह वाढविण्यासाठी पालकांसह स्पर्धेच्या मार्गांवर थांबून चिअर-अप करणार आहेत.कोल्हापूरला धावण्याची संस्कृतीचकोल्हापूर शहराला धावण्याची संस्कृतीच आहे. शेकडो लोक जोतिबाला दर रविवारी जातात. पन्हाळा-पावन खिंड मोहिमेतही कित्येक लोक, महिला सहभागी होतात. कोल्हापूरच्या धावपट्टूंनीही राज्य व राष्ट्रीय स्तरांवर ठसा उमटवला आहे. इथला माणूसही शरीर सदृढ राहावे यासाठी धावणारा, व्यायाम करणारा,सायकलिंग करणारा, पोहणारा आहे. लोकमतच्या मॅराथॉनला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे.मॅरेथॉनच्या वेळा२१ कि.मी. अर्धमॅरेथॉन : सकाळी ६ वाजून १५ मिनिटे१० कि.मी. मॅरेथॉन (पॉवर रन) : ६ वाजून ३० मिनिटे५ कि.मी. (फ न रन) :६ वाजून ४० मिनिटे३ कि.मी. (फॅमिली रन) :६ वाजून ४५ मिनिटे.पार्किंग व्यवस्थाशहरावासीयांना त्रास होऊ नये म्हणून पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.पोलीस उद्यानापासून आत पार्किंग असेल. खानविलकर पेट्रोल पंप, ड्रीम वर्ल्डसमोरून डीएसपी चौकात यावे व तेथून पोलीस उद्यान गेटमधून पार्किंगस्थळी जाता येईल. एका बाजूला दुचाकी व दुसºया बाजूला चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली आहे.