शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

उठसूठ बेताल आरोप करण्यापेक्षा, एका व्यासपीठावर या...!

By admin | Published: April 16, 2015 12:27 AM

महादेवराव महाडिक यांचे आव्हान : ‘राजाराम’चा कारभार पारदर्शकच, स्वत:च्या कारखान्याची तपासणी करा; सभासदांना पेन्शन योजना सुरू करणार

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘राजाराम’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये सामना रंगला आहे. यानिमित्त सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने मांडलेली ‘माझी भूमिका’....प्रश्न - कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे, तर भ्रष्टाचाराचे आरोप कसे?उत्तर - विरोधक गेली अनेक वर्षे शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक आणि सभासद शेतकरी यांच्या हिताचा असाच सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगावर अनेक संकटे आल्याने अनेक कारखाने बंद पडले. मात्र ‘राजाराम’ कारखाना जुना असूनही तो उत्तमरित्या चालू आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ४ लाखांच्या वरती गाळप केले जाते. गेल्या वर्षी कारखान्याने जुनी मशिनरी बदलून अद्ययावत तंत्रज्ञान असलेली मशिनरी कमी खर्चात बसवली. त्यामुळे ३८०० ते ४००० मेट्रीक टन गाळप प्रतिदिन करू शकलो. तरीही आमच्यावर आरोप होत आहेत. ७० ते ७५ कि. मी. अंतरावरून तसेच १२२ गावांतून आम्ही ऊस आणतो. हे विरोधकांनी विसरू नये. उठसूठ आरोप करत बसू नये. हिम्मत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर आरोप करावेत. महाडिक त्यांना त्यावेळी उत्तर देतील. व्यासपीठाचे ठिकाण, वेळ, तारीख त्यांनीच ठरवावी. प्रश्न- निवडणूक ‘राजाराम’ची असताना डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप कसे काय?उत्तर - ‘राजाराम’च्या कारभारावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या कारखान्यात काय चाललंय ते पहावे. या कारखान्यात कार्यक्षेत्रातील कमी आणि पुणा, मुंबई, कोल्हापूर आणि इतर भागातील सभासदच जास्त आहेत. वार्षिक सभेच्या अहवालाच्या प्रतीही काही मोजक्याच काढल्या जातात. प्रश्न - कारखान्याचा कारभार काटकसरीचा आहे म्हणजे नेमका कसा?उत्तर- कारखान्याने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून त्याची परतफेड केली आहे. सद्य:स्थितीत कारखान्यावर एकही रुपयाचे कर्ज नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. इतर देय रकमाही वेळेवर दिल्या जातात. कारखान्याने अवलंबलेल्या पर्चेस सिस्टिममुळे कारखान्याने खरेदी केलेले दर हे साखर आयुक्तालयाच्या दरसूचीपेक्षा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कारखान्यात उधळपट्टी सुरू आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखान्यास सुरुवातीला शासनाकडून मिळालेले शेअर भांडवलही यापूर्वीच संपूर्ण परतफेड केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असा कारखाना आहे. इतका पारदर्शी कारभार आम्ही करीत आहोत. कारखान्याच्या कारभाराची कोणताही सभासद केव्हाही तपासणी करू शकतो.प्रश्न - ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी भविष्यात काय योजना आहेत?उत्तर - कष्टकरी ऊस उत्पादक सभासदांसाठी कारखान्यामार्फत पेन्शन योजना चालू करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भविष्यात अशी योजना राबविणारा ‘राजाराम’ पहिला साखर कारखाना असेल. याशिवाय ठिबक योजना राबविण्यात येणार आहे. ऊस विकास योजना सध्या राबविण्यात आली आहे. कारखान्याला कायमचा व हक्काचा ऊस उपलब्ध होणेसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावात जलसिंचन योजना राबविल्या आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे सभासद आमच्या पाठीशी आहेत. ते पुन्हा आमच्याकडेच सत्ता देतील, यात शंका नाही, असेही आमदार महाडिक शेवटी म्हणाले.- रमेश पाटील, कसबा बावडा(उद्याच्या अंकात माजी मंत्री सतेज पाटील यांची मुलाखत)