शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
6
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
7
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
8
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
9
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
10
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
11
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
12
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
14
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
16
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
17
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
18
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
19
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
20
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."

कपौंडची भिंत पाडल्याचा जाब विचारणाऱ्यालाच ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2020 4:22 PM

कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा ...

ठळक मुद्देकपौंडची भिंत पाडल्याचा जाब विचारणाऱ्यालाच ठार मारण्याची धमकीसातजणांवर गुन्हा : मोतीनगरातील कंजारभाट वसाहतीतील प्रकार

कोल्हापूर : प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून त्यातून पायवाटेसाठी रस्ता केल्याबद्दल जाब विचारणाऱ्या जागामालकास शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार मोरेवाडी रोडवर कंजारभाट वसाहत, मोतीनगरमध्ये घडला. याबाबत मोतीनगरातील सातजणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.विशाल माटुंगे, कविता माटुंगे, राजू माटुंगे, अमित माटुंगे, सुमित माटुंगे, कार्तिक माटुंगे, मनोज माटुंगे (सर्व रा. कंजारभाट वसाहत, मोतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉ. अनुष्का कौस्तुभ वाईकर (रा. प्लॉट नं. ५०, अरुणोदय सोसायटी, राजेंद्रनगर) यांच्या मालकीचा शांतिनिकेतन रस्त्यावर रेव्हेन्यू कॉलनीत प्लॉट आहे. या प्लॉटच्या मागे माटुंगे हे राहण्यास आहेत. माटुंगे यांनी आपल्या घराकडे ये-जा करण्यासाठी वाईकर यांच्या प्लॉटच्या कंपौंडची भिंत पाडून पाऊलवाट केली आहे.

याबाबत डॉ. वाईकर व त्यांचे पती हे माटुंगे यांना जाब विचारण्यासाठी गेले, त्यावेळी माटुंगेसह सातजणांनी वाईकर दाम्पत्याला शिवीगाळ करत, आम्ही येथून जाणारच; तुम्हाला काय करायचे ते करा. तुम्ही येथे कसे घर बांधता ते बघतो, असे म्हणून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. याबाबत डॉ. वाईकर यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्यात सातजणांविरुद्ध तक्रार दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर