कोल्हापूर : परिते बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी फराकटेवाडी (ता. कागल) येथील एका डॉक्टरच्या पत्नीसह एकूण तिघांना करवीर पोलिसांनी अटक केली. लक्ष्मण भिकाजी वाकरेकर (वय ४२, रा. सुळे, ता. पन्हाळा), दिगंबर मारुती किल्लेदार (४२, रा. टिटवे, ता. राधानगरी) व भारती कृष्णात फराकटे (४६, रा. फराकटेवाडी, ता. कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मुख्य सूत्रधार संशयित राणी कांबळे हिच्यासाठी हे अटक केलेले तिघेही एजंट म्हणून कमिशनवर काम करत असल्याचे दिसून आल्याचे सहायक पो. नि. विवेकानंद राळेभात यांनी सांगितले. त्यामुळे आतापर्यंत याप्रकरणी अटक केलेल्यांची संख्या १३ वर पोहोचली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, परिते येथे दि. १८ जुलै रोजी करवीर पोलिसांनी छापा टाकून बेकायदा गर्भलिंग निदान प्रकरण उघडकीस आणले होते, त्या रॅकेटमध्ये मुख्य संशयित आरोपी राणी कांबळे व महेश पाटील यांच्यासह एकूण दहा जणांना अटक केली होती. सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. छाप्यावेळी मिळालेल्या नोंदवहीच्या आधारे पोलिसांनी तपास करत बेकायदा गर्भलिंग प्रकरणाचे रॅकेट चव्हाट्यावर आणले. दि. ८ ऑगस्ट रोजी फराकटेवाडीतील डॉक्टरची पत्नी भारती कृष्णात फराकटे (४६, रा. फराकटेवाडी, ता. कागल) यांना ताब्यात घेतले होते, पण त्यावेळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांना गुरुवारी अटक करण्यात आली. बुधवारी अटक केेलेले लक्ष्मण वाकरेकर व दिगंबर किल्लेदार या दोघांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
फोटो नं.२६०८२०२१-कोल-भारती फराकटे (आरोपी-परिते)
फोटो नं.२६०८२०२१-कोल-लक्ष्मण वाकरेकर (आरोपी-परिते)
फोटो नं.२६०८२०२१-कोल-दिगंबर किल्लेदार (आरोपी-परिते)
260821\26kol_18_26082021_5.jpg~260821\26kol_19_26082021_5.jpg~260821\26kol_20_26082021_5.jpg
फोटो नं.२६०८२०२१-कोल-भारती फराकटे (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-लक्ष्मण वाकरेकर (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-दिगंबर किल्लेदार (आरोपी-परिते)~फोटो नं.२६०८२०२१-कोल-भारती फराकटे (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-लक्ष्मण वाकरेकर (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-दिगंबर किल्लेदार (आरोपी-परिते)~फोटो नं.२६०८२०२१-कोल-भारती फराकटे (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-लक्ष्मण वाकरेकर (आरोपी-परिते)फोटो नं.२६०८२०२१-कोल-दिगंबर किल्लेदार (आरोपी-परिते)