शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

तिघा कॉन्स्टेबलची तडकाफडकी उचलबांगडी : सुहेल शर्मा यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 1:21 AM

कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली.

ठळक मुद्देअवैध व्यावसायिकांशी सलगीचा ठपका ‘आहे त्या स्थितीत पोलीस मुख्यालयात हजर राहण्या’चे आदेश दिले.

एकनाथ पाटील ।कोल्हापूर : अवैध व्यावसायिकांकडून हप्तावसुलीचा धडाका लावणाºया जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी व राजारामपुरी पोलीस ठाण्यांतील तिघा ‘कलेक्टरां’ची पोलीस मुख्यालयात तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली. कॉन्स्टेबल विजय देसाई (लक्ष्मीपुरी), जुबिन शेख (जुना राजवाडा), मिलिंद नलवडे (राजारामपुरी) अशी त्यांची नावे आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी त्यासंबंधीचे आदेश मंगळवारी रात्री दिले. पोलीस दलात पहिल्यांदा अशा प्रकारे झालेल्या कठोर कारवाईने खळबळ उडाली आहे.

खून किंवा गुंतागुंतीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलीस ठाण्यांमध्ये स्वतंत्र गुन्हे शाखा (डिटेक्शन ब्रँच- डीबी पथक) आहे. या पथकात काम करणारे अधिकारी व कर्मचारी गुन्ह्णांची उकल न करता स्वत:चे हित जपत रुबाब मिरविताना दिसतात. अंगात कडक इस्त्रीचे कपडे, पायांमध्ये किमती बूट, तर डोळ्यांवर रेबॅनचा गॉगल अशा पोशाखात वावरणारे हे ‘कलेक्टर’ वादग्रस्त ठरत आहेत.

वर्षभरात पोलीस दलातील डझनभर कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यामुळे जनतेमध्ये विश्वास निर्माण केलेल्या पोलीस दलाची अशा भ्रष्ट कर्मचाºयांच्या वर्तनामुळे नाचक्की झाली. हप्तावसुली जोरात सुरू झाल्याने अवैध व्यवसाय फोफावले. यावर नियंत्रण ठेवायचे कोणी? असा प्रश्न कोल्हापूर पोलीस दलात होता. पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी अप्पर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्यावर ही जबाबदारी सोपवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

शर्मा यांनी पोलीस ठाण्याअंतर्गत कलेक्टरांची यादी मिळवून त्यांच्यावर गेले दोन महिने टेहळणी ठेवली होती. विजय देसाई, जुबिन शेख, मिलिंद नलवडे यांच्या कामकाजाची शहानिशा केली असता त्यांची अवैध व्यावसायिकांशी सलगी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी मंगळवारी रात्री सातच्या सुमारास वायरलेसवरून निरोप धाडत या तिघांना ‘आहे त्या स्थितीत पोलीस मुख्यालयात हजर राहण्या’चे आदेश दिले. त्यानुसार ते रात्रीच हजर झालेसातजणांचा समावेशशहरातील अवैध व्यावसायिकांशी लागेबांधे असणाºयांमध्ये सात कॉन्स्टेबलचा समावेश आहे. त्यांपैकी तिघांची तडकाफडकी बदली झाली. उर्वरित चौघांची चौकशी सुरू असून येत्या दोन दिवसांत त्यांचीही उचलबांगडी होणार आहे.