प्रवीण देसाई - कोल्हापूरजिल्ह्यातील आमदारांनी या आर्थिक वर्षातील आपला जास्तीत जास्त निधी रस्त्यांचे डांबरीकरण, खडीकरण, कॉँक्रिटीकरण या कामावर खर्च केला आहे. जिल्ह्यातील १२ आमदारांचे मिळून ३ कोटी ५५ लाख ७१ हजार ५१९ रुपये रस्ते कामांसाठीच खर्च केले आहेत. त्याखालोखाल सामाजिक, सांस्कृतिक हॉलसाठी ९० लाख रुपये खर्ची घातले आहेत. शाळांना संगणक व शैक्षणिक साहित्यासाठी शिरोळचे ज्येष्ठ आमदार सा. रे. पाटील व पदवीधरचे आमदार चंद्रकांतदादा पाटील वगळता कुठल्याही आमदाराने यासाठी निधी खर्च केलेला नाही.जिल्ह्यातील बारा आमदारांनी मिळालेल्या निधीपैकी एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात सुमारे सहा कोटी रुपयांचा निधी विकासकामांवर खर्च केला आहे. यामध्ये त्यांनी नागरिकांच्या जिव्हाळ्याचा व गरजेच्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठीच खर्च केला आहे. कागलचे आमदार तथा जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकूण १२ कामांपैकी आठ कामे ही रस्त्याची केली आहेत. त्यासाठी ३९ लाख ९२ हजार रुपये निधी खर्च झाला आहे. त्या खालोखाल करवीरचे आमदार चंद्रदीप नरके, हातकणंगलेचे आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रत्येकी सात रस्त्यांच्या कामांसाठी निधी दिला आहे. त्यासाठी नरके यांनी ७० लाख ६६ हजार व मिणचेकर यांनी २३ लाख ९६ हजार रुपये निधी दिला आहे. राधानगरीचे आमदार के. पी. पाटील यांनी २२ लाख ४४ हजार रुपयांचा निधी पाच रस्त्यांसाठी, तर कोल्हापूर दक्षिणचे आमदार तथा गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ३८ लाख ८० हजार रुपये चार रस्त्यांसाठी दिले आहेत.इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी २४ लाख ५८ हजार ७५५ रुपये चार रस्त्यांच्या कामासाठी दिले आहेत. तसेच त्यांनी शहरातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर चौकात बसविण्यासाठी सहा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांकरिता १४ लाख ८७ हजार ७६२ रुपये निधी दिला आहे. कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी २१ लाख २८ हजार रुपयांचे चार रस्ते आपल्या मतदारसंघात दिले आहेत. त्यांनी स्वच्छता गृहाच्या एका कामासाठी ७ लाख १० हजार रुपयांचा निधी दिला आहे; परंतु इतर आमदारांनी स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले आहे, तर सर्वच आमदारांनी आरोग्याकडे कानाडोळा केल्याचे चित्र आहे. सा. रे. पाटील व चंद्रकांतदादा पाटील यांनीही आपल्या निधीतील प्राधान्य हे रस्ते कामालाच दिले आहे. असे असले तरी त्यांनी शाळांना संगणक व शालोपयोगी शैक्षणिक साहित्यासाठी चांगला निधी दिला आहे.विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांनी भुये (ता. करवीर) येथे पेव्हिंग ब्लॉकच्या कामासाठी पाच लाखांचा निधी खर्च झाला आहे, तर चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी ४ लाख ९९ हजार रुपयांचा निधी हा रस्त्याच्या कामासाठीच खर्च केला आहे.कामाचे स्वरूपसंख्यानिधी खर्चसंरक्षक भिंत०४१३ लाख ५७ हजारखुले सभागृह०२१० लाख ९८ हजारसीसीटीव्ही कॅमेरे०६१४ लाख ८७ हजार ७६२एस.टी. निवारा शेड/स्मशान शेड०२६ लाख ७० हजारनदी घाट बांधणे०२९ लाख ९८ हजारव्यायामशाळा साहित्य०१४ लाख ९६ हजारशाळेस बेंच पुरविणे०११ लाख ५० हजारकामाचे स्वरूपसंख्यानिधी खर्चरस्ते६२३ कोटी ५५ लाख ७१ हजार ५१९सांस्कृतिक हॉल/सामाजिक सभागृह११९० लाख ८० हजारगटर्स बांधणे०७३० लाख ५ हजार ३८६पेव्हिंग ब्लॉक बसविणे०७३२ लाख १७ हजारव्यायामशाळा बांधणे०६३० लाख २७ हजारसंगणक२२१७ लाख ६० हजार
सव्वा तीन कोटी निधी रस्त्यासाठी
By admin | Published: July 24, 2014 11:42 PM