गावात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ५० कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये ४० कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. १० रुग्ण बरे झाले आहेत. गावात वाढता संसर्ग पाहता ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या झालेल्या बैठकीत कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी तीन दिवसांचा जनता कर्फ्यू करण्याचा निर्णय झाला. हा जनता कर्फ्यू दि. १ ते ३ मेअखेर करण्यात येणार आहे. यामध्ये मेडिकल व दूध विक्री, दवाखाने ही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. इतर दुकाने सुरू राहिल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या प्रशासनाने केले आहे. ग्रामपंचायत भादोलेचे सरपंच आनंदराव कोळी, उपसरपंच अंजूनबी सनदे, विक्रम माने, आनंदराव सुतार, शहाजी घोलप, तलाठी तुषार भोसले, संजय अवघडे, तुकाराम पाटील यांच्यासह आशा स्वयंसेविका, आदी उपस्थित होत्या.
भादोलेत तीन दिवसांचा जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:31 AM