गावातील औषध दुकाने वगळता दूध संस्था, सेवा संस्था, सर्व दुकानेही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी गावातील सर्व कुटुंबांचा सर्व्हे करून घेण्याच्या सूचना करवीरचे गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी दिल्या.
ग्रामपंचायतीने गावामध्ये जंतुनाशक औषध फवारणी केली आहे. तसेच गावातील सर्व कुटुंबांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप केले आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना दंड करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
या बैठकीला सरपंच उज्ज्वला पाटील, उपसरपंच नामदेव पाटील, डी. एस. पाटील, आर. टी. पाटील, ए. के. पाटील, बाजीराव पाटील, प्रकाश पाटील, पोलीसपाटील लता पाटील, रामनाथ पाटील, कृष्णात पाटील, आरोग्य सेवक व सेविका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामसेवक शिवाजी वाडकर उपस्थित होते.
फोटो : २८ आमशी लॉकडाऊन
ओळी -
आमशी (ता. करवीर) येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार शीतल मुळे-भामरे व गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी ग्राम दक्षता समितीची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.