बेळगाव : कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये शुक्रवारपासून (४ जून) पासून तीन दिवस कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत घोषणा केली आहे. या दरम्यान, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. लाॅकडाऊन काळात बँका जरी बंद असल्या तरी एटीएम मात्र सुरू राहणार असल्याची माहिती लीड बँकेच्या व्यवस्थापकांनी दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील नव्याने आढळून येणाऱ्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येतील वाढ अद्यापही कायम असल्यामुळे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत तीन दिवस कडक लाॅकडाऊनचा आदेश जारी केला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. तसेच या काळात बँकाही बंद राहणार आहेत.