शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

Kolhapur: तीन किलो सोने, अडीच कोटींची रोकड लुटली; ७ आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 2:14 PM

अपहरण, दरोडा गुन्ह्यातील आरोपी हातकणंगले आणि आटपाडीचे

कोल्हापूर : लक्ष्मी गोल्ड बुलियनच्या कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्याकडील तीन किलो सोने आणि दोन कोटी ५२ लाख एक हजार २०० रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या सात जणांच्या टोळीला जिल्हा व सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी (दि. २९) दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि प्रत्येकी ४० हजार ५०० रुपयांचा दंड सुनावला. राजेंद्रनगर येथे अपहरण आणि दरोड्याचा गुन्हा जून २०१९ मध्ये घडला होता.लक्ष्मण अंकुश पवार (वय २९, रा. खटके वस्ती, लिंगिवरे, ता. आटपाडी, जि. सांगली), गुंडाजी तानाजी नंदीवाले (वय २९, रा. तमदलगे, ता. शिरोळ), अविनाश बजरंग मोटे (वय २९), अक्षय लक्ष्मण मोहिते (वय २९), इंद्रजीत बापू देसाई (वय २५, तिघे रा. हातकणंगले), राजीव ऊर्फ झुमऱ्या बळीराम कदम (वय २८) आणि संतोष ऊर्फ भावड्या ज्ञानोबा मोरे (वय ३१, दोघे रा. दिघंची, ता. आटपाडी) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील आठवा आरोपी सोमनाथ यल्लाप्पा माने (रा. दिघंची) हा फरार आहे.सरकारी वकील अमित महाडेश्वर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी १४ जून २०१९ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास राजेंद्रनगर रिंगरोड येथे लक्ष्मी बुलियनच्या कर्मचाऱ्यांची कार अडवली. कारवर दगडफेक करून कर्मचाऱ्यांना मारहाण केली. त्यानंतर जबरदस्तीने कार बांबवडेच्या दिशेने नेऊन कारमधील रोकड आणि सोने काढून घेतले. राजारामपुरी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सुरू होता.तत्कालीन पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी गुन्ह्याचा तपास करून सात संशयितांना अटक केली. न्यायालयात १८ साक्षीदार तपासण्यात आहे. उपलब्ध पुरावे, साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश तांबे यांनी सात आरोपींना शिक्षा सुनावली. ॲड. गजानन कोरे, पैरवी अंमलदार अशोक शिंगे, नजराना देसाई, विशाल तळेकर, सागर माने यांची खटल्याच्या कामकाजात मदत झाली.दरोड्याची दहशत अन् शिताफीने तपासलक्ष्मी बुलियनच्या कारवर धाडसी दरोडा पडल्यानंतर सराफ बाजारात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. अपहरण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत आणि त्यांच्या पथकाने शिताफीने तपास करून दरोडेखोरांना पकडले. त्यांच्या विरोधातील ठोस पुरावे गोळा केल्यामुळे आरोपींना सक्तमजुरीची शिक्षा झाली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालय