शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
2
सरासरीपेक्षा अधिक पाऊस, उष्णताही वाढणार, ऑक्टोबरमध्ये हवामानाचा पॅटर्न बदलणार
3
T20 वर्ल्ड कपआधी स्मृती मंधानाचे मोठे विधान, म्हणाली, "IND vs PAK सामना म्हणजे..."
4
अजित पवार यांच्या घड्याळाचे सेल, शरद पवारांच्या हाती, असीम सरोदे यांची सूचक टिप्पणी 
5
महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्यला जवळपास फायनल? काँग्रेसला सर्वाधिक तर ठाकरे आणि पवारांना एवढ्या जागा 
6
video: जबरदस्त ॲक्शन, दमदार डायलॉग; रजनीकांत-अमिताभ यांच्या 'वेट्टैयान'चा ट्रेलर रिलीज
7
निलेश राणे शिवसेनेतून निवडणूक लढणार? उदय सामंत म्हणाले, "जर उमेदवारी दिली तर..."
8
विनेश फोगाटच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी मैदानात; म्हणाल्या- 'ही दुष्टांविरोधातील लढाई...'
9
साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आले एकत्र; अजित पवारही सोबत, कारण काय?
10
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
11
BSNL ची मोठी घोषणा; ग्राहकांना स्वस्त 4G स्मार्टफोन देणार, 'या' कंपनीसोबत केला करार
12
इस्रायलचा हिजबुल्लाहच्या मुख्यालयासह १५० ठिकाणांवर हल्ला, अनेक दहशतवादी ठार
13
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
14
हिज्बुल्लाविरोधात जमिनी कारवाईत इस्रायलला पहिला झटका, लेबनानमध्ये एका कमांडरचा मृत्यू
15
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
16
Video: जपानच्या विमानतळावर अमेरिकन बॉम्बचा अचानक स्फोट, ८७ विमान उड्डाणे रद्द
17
X युजर्सना यापुढे 'ही' सुविधा मिळणार नाही; इलॉन मस्क यांनी केली घोषणा, काय बदलले? पाहा...
18
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
19
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
20
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक

मारहाण करून हवालाचे तीस लाख रुपये लुटले

By admin | Published: July 25, 2016 12:39 AM

कोल्हापुरातील घटना : तिघा लुटारूंचे शाहूपुरी पोलिस ठाण्याजवळच कृत्य

कोल्हापूर : येथील व्हीनस कॉर्नर ते शाहूपुरी स्टेशन रोड परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर मोपेडवरील चालकाला ठोसा लगावून हवालाचे तीस लाख रुपये असलेली बॅग तिघा चोरट्यांनी हातोहात लंपास केली. शनिवारी रात्री नऊ वाजता घडलेल्या लूटमारीमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले. शहरात व शहराबाहेर नाकाबंदी करून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असता ते मिळून आले नाहीत. सांगलीतील एम. माधव कंपनीचे हवालाचे पैसे घेऊन कंपनीचा कर्मचारी कोल्हापुरात आला असताना ही घटना घडली. अरुणभाई अमतभाई सुतार (वय ४२, रा. मारुती मंदिर, सांगली, मूळ गाव खेरवाट, ता. म्हैसाना-गुजरात) हे धवलभाई पटेल (रा. सूरत) यांच्या सांगलीतील एम. माधव कंपनीत नोकरी करतात. कंपनीचे दोन कामगार रामभाऊ पटेल व राकेश पटेल असे तिघे मिळून ते भाड्याने खोली घेऊन राहण्यास आहेत. रामभाऊ हा एक महिन्यापूर्वी आपल्या मूळ गावी पिंपल येथे गेला आहे. या कंपनीचा व्यवहार व्यवस्थापक चिंतन पटेल ऊर्फ पिंटू हे पाहतात. या कंपनीमध्ये हवालाच्या पैशांची ने-आण करण्याची जबाबदारी अरुणभाई सुतार यांच्यावर आहे. शनिवारी साडेपाचच्या सुमारास व्यवस्थापक चिंतन पटेल यांनी त्यांना ३० लाख रुपये कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील एम. माधवलाल कंपनीचे व्यवस्थापक निकेश जयंतीलाल पटेल यांच्याकडे पोहोच करण्यासाठी दिले. पैसे प्रवासी बॅगेत घेऊन ते सांगलीहून एस. टी. बसने कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानक येथे रात्री साडेआठ वाजता आले. याठिकाणी त्यांची वाट पाहत निकेश बसले होते तेथून दोघे मोपेडवरून दाभोळकर कॉर्नरमार्गे रेल्वे स्टेशनकडे येत होते. सुतार यांनी पैशांची बॅग मोपेडच्या फुटरेस्टच्या पुढे ठेवली होती. रेल्वे स्टेशन परिसरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर आले असता रस्त्याच्या मधोमध स्प्लेंडर मोटारसायकल उभी करून तरुण उभा होता. त्यामुळे निकेश यांनी मोपेडचा वेग कमी करताच पाठीमागून पल्सरवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी पाठीमागे बसलेल्याने निकेश यांच्या उजव्या कानावर हाताने ठोसा लगावला. अचानक जोराचा मार लागल्याने ते मोपेडसह खाली पडले. मागे बसलेले सुतारही खाली पडले. यावेळी पैशांची बॅग घेऊन ते तिघे तरुण पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकाराने सुतार व निकेश गोंधळून गेले. त्यांनी आरडाओरड केली परंतु नागरिक जमा होईपर्यंत चोरटे पसार झाले होते तेथून त्यांनी थेट शाहूपुरी पोलिस ठाणे गाठले. शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे यांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सर्वत्र नाकाबंदी केली; परंतु चोरटे मिळून आले नाही. पाळत ठेवून केली लूटमार मध्यवर्ती बसस्थानक परिसरात सदर बाजार, विचारेमाळ, कावळा नाका, शिवाजी पार्क येथील काही सराईत गुन्हेगारांची नेहमी ऊठबस असते. ते या परिसरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून असतात. निकेश हे सुतार यांची मध्यवर्ती बसस्थानकाच्या बाहेर वाट पाहत बसले होते. सुतार कावळा नाकादरम्यान आले त्यावेळी त्यांनी मी पैसे घेऊन आलो आहे, तुम्ही स्टेशनवर या, असा फोन निकेश यांना केला होता. त्यावेळी निकेश यांनी इथेच बाहेर थांबलो असल्याचे सांगितले. त्यानंतर बसमधून उतरून सुतार निकेशजवळ आले. यावेळी त्यांनी निकेशच्या दोन्ही पायाच्या मध्ये रिकाम्या जागेत बॅग ठेवत पैसे आहेत, लक्ष ठेव, असे म्हटले. त्यांचे हे बोलणे याठिकाणी ऊठबस करणाऱ्या गुन्हेगारांनी ऐकून ही लूटमार झाली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. अंधाराचा फायदा लुटारूंनी अंधाराचा फायदा घेत निकेश यांना मारहाण करून पैशांची बॅग लंपास केली. अंधार असल्याने त्यांच्या दोन्ही मोटारसायकलींचे नंबरही ओळखता आले नाहीत. या प्रकाराने आम्ही दोघेही भांबावून गेलो होतो. त्यामुळे आम्हाला काहीच सुचत नव्हते. त्या लुटारूंचे वर्णनही या दोघांना सांगता येत नव्हते. महिन्यात दुसरी घटना : पोलिस असल्याची बतावणी करून कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकांच्या व्हॅनसह सुमारे दोन कोटी २२ लाख रुपयांच्या सोन्या-चांदीच्या ऐवजावर दरोडा टाकणाऱ्या लुटारूंचा अद्याप शाहूपुरी पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. ही घटना ताजी असतानाच दुसरी लूटमारीची घटना घडल्याने नागरिक, व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे.