कोल्हापूर : जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा फैलाव वाढत आहे. ‘सीपीआर’ मध्ये ‘स्वाइन फ्लू’ आजाराने बुधवारी दोघांचा मृत्यू झाला आहे. नीता राजेंद्र सुतार (वय ३०, रा. गुड्डेवाडी, ता. चंदगड), वसंत रंगराव पाटील (४६, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) अशी त्यांची नावे आहेत, तर दि. १९ सप्टेंबर रोजी मृत झालेल्या शालन शिवाजी कुंभार (५५, रा. मंगरू, ता. बत्तीस शिराळा, जि. सांगली) यांचाही स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याचे अहवालावरून बुधवारी स्पष्ट झाले. आतापर्यंत जिल्ह्यात ‘स्वाइन फ्लू’ने १७ जणांचा बळी गेला आहे. रोगाचा फैलाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणांची धावपळ सुरूआहे.बुधवारी मृत्यू झालेल्या नीता राजेंद्र सुतार या दि. ११ सप्टेंबर रोजी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी ‘सीपीआर’ रुग्णालयात दाखल केले होते. बुधवारी सकाळी त्यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.वसंत रंगराव पाटील (४६, रा. थेरगाव, ता. शाहूवाडी) यांनाही एका खासगी रुग्णालयात उपचारासाठीदि. ११ सप्टेंबर रोजी दाखल केलेहोते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ‘सीपीआर’ रुग्णालयातदाखल केले. बुधवारी दुपारीत्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, शालन कुंभार तापाच्या आजाराने १६ सप्टेंबर रोजी उपचारासाठी दाखल झाल्या असताना त्यांचाही मृत्यू दि. १९ रोजी झाला.शहरात ४२ रुग्णांवर उपचार सुरूजिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांत स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. थंडी, तापाची लागण झालेल्या सात रुग्णांची बुधवारी नव्याने ‘सीपीआर’ रुग्णालयात भर पडली. शहरातील खासगी रुग्णालयात एकूण ४२ रुग्ण ‘स्वाइन’चे संशयित आहेत. काहींच्या रक्तांचे नमुने प्राप्त झाले असून, त्यांंपैकी ३२ जणांच्या रक्तांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. गणेशोत्सव काळात गर्दीत सहभागी झालेल्या अनेकांना स्वाइनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात स्वाइन फ्लूने आणखी तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:29 AM