कोल्हापूर : शहरातील ताराबाई रोड व महाद्वार रोड या ठिकाणी विनापरवाना तसेच थकबाकीदार परवानाधारक असणारी तीन यात्री निवास मंगळवारी महानगरपालिका परवाना विभागाने सील केली. कपिलेश्वर यात्री निवास, शिवम यात्री निवास व अंबाबाई यात्री निवास यांचा त्यामध्ये समावेश आहे.
महानगरपालिका परवाना विभागामार्फत शहरातील विनापरवाना व्यावसायिक तसेच थकबाकीदार परवानाधारक यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून सोमवारी ही कारवाई करण्यात आली. मार्केट यार्डसमोरील सहारा बॅटरी दुकान विनापरवाना व्यवसाय करत असल्याने सील करण्यात आलेे. तसेच परवाना नूतनीकरण न केलेल्या ३० व्यावसायिकांकडून थकबाकी वसूल करण्यात आली.
सदरची कारवाई उपआयुक्त क्रमांक ३ शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परवाना अधीक्षक राम काटकर, परवाना निरीक्षक संजय अतिग्रे, मंदार कुलकर्णी, रवि पोवार व विजय वाघेला यांनी केली.
अशी कारवाई यापुढेही सुरु राहणार असून संबंधित व्यवसायिकांनी त्वरीत , शिवाजी मार्केट येथील परवाना विभागाशी संपर्क साधून परवाना नुतनीकरण करुन घ्यावा तसेच थकबाकी व नवीन परवानाधारक यांनी आपला परवाना काढून घ्यावा अन्यथा कारवाई केली जाईल, असा इशारा परवाना विभागामार्फत देण्यात आला आहे.