कोल्हापूर : गर्भपाताच्या गोळ्या देणारी डॉ. दीपाली सुभाष ताईगडे (वय ४६, रा. आदिनाथनगर, कळंबा) हिच्यासह तिघींची चार दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी झाली. त्यांनी गर्भपाताच्या गोळ्या कोणाकडून आणल्या याचा शोध सुरू आहे. तसेच गर्भलिंग निदान करण्यासाठी येणारा सुयश सुनील हुक्केरी याचा शोध सुरू असल्याचे करवीर पोलिसांनी सांगितले.अटकेतील डॉ. दीपाली ताईगडे हिच्या हॉस्पिटलमधून पोलिसांनी गर्भपाताच्या रिकाम्या गोळ्यांचे एक पाकीट, गोळ्या असलेली दोन पाकिटे, तिचे वैद्यकीय प्रमाणपत्र, डमी रुग्णास दिलेल्या गर्भपाताच्या तीन गोळ्या, मोबाइल, ड्रॉव्हरमधील १ लाख ४३ हजार ३०० रुपये आणि बेडखाली ठेवलेले तीन हजार रुपये जप्त केले. वरणगे पाडळी (ता. करवीर) येथून अटक केलेल्या सत्यप्रिया ऊर्फ सुप्रिया माने आणि धनश्री मुधाळे यांच्याकडून सहा हजार रुपये, गर्भपाताच्या गोळ्यांची दोन पाकिटे, दोन मोबाइल पोलिसांनी जप्त केले. दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलिस उपनिरीक्षक विनायक सपाटे आणि स्नेहल टकले करीत आहेत.हुक्केरी हा सराईत गुन्हेगारसोनोग्राफी मशीनचालक सुयश हुक्केरी हा या टोळीतील सराईत गुन्हेगार आहे. त्याचे वडीलही अवैध गर्भलिंग निदान करीत होते. या दोघांवर दक्षिण महाराष्ट्रासह कर्नाटकात काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्याच्या अटकेसाठी पथक रवाना झाल्याचे पोलिस निरीक्षक किशोर शिंदे यांनी सांगितले.
Kolhapur: गर्भलिंग निदान गुन्ह्यातील तिघींना पोलिस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 12:07 IST