पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, शहीद जवान महादेव तोरस्कर यांच्या पत्नी वृषाली यांना घर बांधकामासाठी शासनाने
येथील विजयनगर परिसरात दोन गुंठे जागा दिली आहे.
बुधवारी (७) सकाळी त्या व त्यांचा भाऊ विशाल रावळ हे दोघे त्या जागेवर वाढलेली झाडे - झुडपे काढून साफसफाई करीत होते. त्यावेळी होडगे व आरबोळे यांनी या खुल्या जागेत तुम्ही का आला? जागेशी तुमचा काय संबंध ? असे विचारत शिवीगाळ करून त्यांना नोकरी घालवण्याची धमकी दिली. तसेच त्यांचे साफसफाई करतानाचे फोटो काढले.
वृषाली तोरस्कर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार दादू खोत अधिक तपास करत आहेत.