शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

नवी पिढी घडविण्यासाठी १५ कोटींचे तीन भूखंड दान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 5:01 AM

पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत.

- विश्वास पाटीलकोल्हापूर : नुसत्या पदव्या घेऊन आजचा तरुण स्वत:च्या पायावर उभा राहू शकणार नाही. त्यासाठी त्याला व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण मिळायला हवे, या भावनेतून पुण्यातील अनगोळ दाम्पत्याने हडपसर परिसरातील स्वामी विवेकानंद सहकारी औद्योगिक वसाहतीतील २२ हजार चौरस फुटांचे तब्बल तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. कर्मवीर अण्णांच्याबद्दल कृतज्ञता आणि सामाजिक उतराई या भावनेतून अनगोळ दाम्पत्याने हा निर्णय घेतला. या जागेची किंमत सुमारे १५ कोटी रुपये होते. या मोक्याच्या जागेवर ‘रयत’तिथे स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करीत आहे.डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांचे वडील सांगली जिल्ह्यातील ऐतवडे खुर्दचे. बाळगोंड पाटील असे त्यांचे नाव. ते एक्साईज सुपरिंटेंडेंट होते. त्यांना सात बहिणी व तीन भाऊ. त्यांतील मालती या सर्वांत मोठ्या व कोल्हापूरच्या डॉ. साधना झाडबुके या लहान बहीण. ज्या काळात मुलींच्या शिक्षणाचा समाजाने फारसा विचार केला नव्हता, तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालतीताई शिकल्या. जे. जे. स्कूल आॅफ इकॉनॉमिक्समधून त्या पदवीधर झाल्या. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या त्या प्रमुख होत्या. स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी काम केले. त्यांच्या पतींना पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील पायोनिअर मानले जाते. गव्हर्न्मेंट कॉलेजच्या पहिल्या बॅचचे ते स्कॉलर होते. त्यांना सोलर ऊर्जेमध्ये खूपच रस होता. त्यासंबंधीचे कोर्सेस सुरू करण्यासाठी त्यांनी ही जागा १९९८ ला घेतली. परंतु वृद्धत्वामुळे ते शक्य झाले नाही; म्हणून कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या चांगल्या संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांना वाटत होते. पतीचे हे स्वप्न त्यांनी पूर्ण केले. कर्मवीर अण्णांची हीरकमहोत्सवी पुण्यतिथी व ‘रयत’च्या शताब्दी वर्षानिमित्त ही जागा दिल्याबद्दल डॉ. मालती अनगोळ यांचा संस्थेचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते सातारा येथे नुकताच सत्कार करण्यात आला.कर्मवीर अण्णांच्यामुळे त्या काळी आमचे शिक्षण झाले; त्यामुळे त्याबद्दलची कृतज्ञता व तरुण मुलांच्या हाताला काहीतरी काम मिळावे यासाठी स्किल डेव्हलपमेंट केंद्र सुरू करावे म्हणून ‘रयत’ला ही जागा दिली. आमचे दान सत्पात्री लागल्याचा आनंद आहे.- डॉ. मालती अनगोळ, पुणे

टॅग्स :Puneपुणे